नौदलाच्या ताफ्यात सामील होणार ‘तारागिरी’ स्टील्थ युद्धनौका
3 एप्रिल रोजी ‘द डेयरिंग ईगल’चा होणार समावेश : आत्मनिर्भर भारताचा नवा अध्याय सुरू
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय नौदलाच्या ताफ्यात 3 एप्रिल रोजी स्वदेशी स्टील्थ युद्धनौका ‘तारागिरी’ सामील करण्यात येणार आहे. नौदलाच्या प्रवक्त्याने एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. नौदलाने ‘द डेयरिंग ईगल’ शीर्षक देश आत्मनिर्भर भारताचा नवा अध्याय सुरू होत असल्याचे म्हटले आहे. भारताच्या सागरी सार्वभौमत्वाला दर्शविणारी ही संधी असेल. तारागिरी नौदलाच्या ताफ्यात सामील झाल्याने भारत पूर्णपणे स्वदेशी आत्मनिर्भर नौसैनिक क्षमतेच्या दिशेने पावले टाकणार आहे. तारागिरी युद्धनौका नौदलाला सुपूर्द करण्याचा कार्यक्रम विशाखापट्टणम येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षत्व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह करणार आहेत.
6,670 टनाची युद्धनौका
प्रोजेक्ट 17ए श्रेणीच्या चौथ्या प्लॅटफॉर्मच्या रुपात तारागिरी केवळ एक जहाज नाही. ही 6,670 टनांची युद्धनौका असून ती मेक इन इंडियाचा निर्धार दर्शविते. तसेच भारताच्या स्वदेशी शिपयार्ड्सची इंजिनियरिंग क्षमताही दर्शविते. ही युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात सामील झाल्याने पाकिस्तान अन् चीनचे टेन्शन निश्चितपणे वाढणार आहे.
शत्रूच्या रडारला लागणार नाही सुगावा
-मझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडकडून तारागिरी युद्धनौकेची निर्मिती करण्यात आली आहे. ही युद्धनौका शत्रूच्या रडारपासून वाचविणाऱ्या घातक स्टील्थ तंत्रज्ञानाने युक्त आहे.
-तारागिरी डिझेल-गॅस प्रपल्शन तंत्रज्ञानाने संचालित होईल. ही हायस्पीड हाय एंड्योरेन्स विविधतेने युक्त आहे. तसेच बहुआयामी सागरी क्षमतांनी युद्धनौका सज्ज आहे.
-युद्धनौकेत समुद्रातून पृष्ठभागावर मारा करणारी क्षेपणास्त्रsही जोडण्यात आली आहेत. याचबरोबर याला पाणबुडीविरोधी युद्धाच्या दृष्टीकोनातून डिझाइन करण्यात आले आहे.
-तारागिरी स्टील्थ युद्धनौका आपत्कालीन संकटादरम्यान मानवीय मदत आणि मदत पोहोचविण्याच्या हिशेबाने डिझाइन करण्यात आले आहे. यामुळे सागरी बचावकार्यात मदत होणार आहे.
प्रोजेक्ट 17ए काय आहे?
-प्रोजेक्ट 17ए अंतर्गत शिवालिक श्रेणीच्या अत्याधुनिक 7 नीलगिरी श्रेणीच्या स्टील्थ फ्रिगेट्सची निर्मिती केली जाणार आहे. 7 युद्धनौकांपैकी 4 (नीलगिरी, उदयगिरी, तारागिरी, महेंद्रगिरी) ची निर्मिती एमडीएलकडून करण्यात येतेय.
-उर्वरित तीन (हिमगिरी, दूनागिरी, विंध्यगिरी)ची निर्मिती जीआरएसईकडून करण्यात येतेय. नीलगिरी श्रेणीच्या जवळपास 75 टक्के प्रणाली स्वदेशी आहेत. सागरी अभियानांसाठी निर्मित या फ्रिगेट अनेक प्रकारच्या धोक्यांना हाताळू शकतात.
-पी17ए युद्धनौका अनेक धोकादायक शस्त्रास्त्रांना नेण्यास सक्षम आहेत. यात दीर्घ पल्ल्याची पृष्ठभागावरून आकाशात मारा करणारी क्षेपणास्त्रs (एलआरएसएएम), ब्राह्मोस, बराक-8, पाणबुडीविरोधी टॉरपीडो, आयआरएल सामील.