तारा सुतारिया अन् वीरचा ब्रेकअप
बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारित आणि अभिनेता वीर पहाडिया यांचे नाते तुटल्याचे समोर आले आहे. दोघांनी स्वत:च्या वाटा वेगळ्या केल्या असून त्यांचा ब्रेकअप झाला आहे. तारा आणि वीरने स्वत:चे नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
तारा आणि वीर हे काही दिवसांपूर्वी मुंबईत एपी ढिल्लोंच्या कॉन्सर्टमध्ये सहभागी झाले होते. तेथे स्टेजवर तारा आणि एपी ढिल्लोंने परस्परांना आलिंगन दिले होते. दोघांचा हा व्हिडिओ समोर आल्यावर तारावर टीका होऊ लागली होती. या कॉर्नर्टमधील वीरचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यात तो नाराज दिसून येत होता.
तारा आणि वीर हे मागील वर्षापासून परस्परांना डेट करत होते. दोघांनाही अनेकदा एकत्र पाहिले गेले होते, ज्यानंतर डेटिंग करत असल्याचे समोर आले होत. जुलै 2025 मध्ये दोघांनी सोशल मीडियारव परस्परांसोबत रोमँटिक फोटो शेअर करत स्वत:च्या नात्याची पुष्टी दिली होती. वीरपूर्वी तारा ही आदर जैनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. परंतु ब्रेकअपनंतर आदरने आलेखा अडवाणीसोबत विवाह केला होता. आलेखा ही ताराची मैत्रिण होती.