For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आदित्यला डेट करतेय तारा

06:32 AM May 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
आदित्यला डेट करतेय तारा
Advertisement

बॉलिवूड वर्तुळात आता नव्या अफेयरची चर्चा रंगू लागली आहे. अभिनेत्री तारा सुतारिया आणि वीर पहाडिया यांचा यापूर्वीच ब्रेकअप झाला आहे. आता तारा ही आदित्य रॉय कपूरला डेट करत असल्याचे समोर आले आहे. आदित्य आणि तारा हे आगामी काळात ‘ओम’ चित्रपटात एकत्र दिसून येणार आहेत. परंतु याचदरम्यान दोघेही आता अधिकृतपणे परस्परांना डेट करत असल्याचे कळते.

Advertisement

आदित्य आणि तारा यांना अनेक सोहळे आणि खासगी पार्ट्यांमध्ये एकत्र पाहिले गेले आहे. ओम चित्रपटाच्या वर्कशॉपदरम्यान त्यांच्यातील केमिस्ट्री अनेकांच्या नजरेत आली होती. परंतु आता दोघेही नात्यात अडकत असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही कलाकार स्वत:चे आयुष्य खासगी ठेवण्यासाठी ओळखले जातात. आदित्य आणि तारा हे परस्परांसोबत चांगला वेळ घालवत आहेत. तसेच त्यांच्या निकटवर्तीयांनी त्यांच्यात एका मजबूत नात्याचे संकेत दिले आहेत. तारा अलिकडेच मुंबईत नव्या घरात रहायला गेली आहे. तारा आणि वीर यांचा चालू वर्षाच्या प्रारंभी ब्रेकअप झाला होता. परंतु त्यानंतर ताराने आता नव्या रिलेशनशिपमध्ये जात मागील घटनाक्रम विसरून गेल्याचे संकेत दिले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.