तन्वी, वेन्नला यांना कांस्य पदक
वृत्तसंस्था / सोलो (इंडोनेशिया)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठांच्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा आणि वेन्नला कलागोटला यांनी वैयक्तिक गटात कांस्यपदक पटकाविले.
शनिवारी या स्पर्धेतील झालेल्या कनिष्ठ महिलांच्या एकेरीच्या सामन्यात वेन्नला कलागोटलाला चीनच्या लियु या कडून 15-21, 18-21 अशा सरळ गेम्समध्ये 37 मिनिटांत हार पत्करावी लागली. तर महिलांच्या एकेरीतील दुसऱ्या एका सामन्यात चीनच्या आठव्या मानांकीत यीन क्विंगने 35 मिनिटांच्या कालावधीत भारताच्या द्वितीय मानांकीत तन्वी शर्माचे आव्हान 21-13, 21-14 अशा सरळ गेम्समध्ये संपुष्टात आणले. या स्पर्धेत पहिल्यांदाच महिलांच्या एकेरीमध्ये दोन स्पर्धकांनी एकाचवेळी कांस्यपदक मिळविण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या महिन्यात झालेल्या अमेरिकन खुल्या सुपर 300 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत तन्वी शर्माने उपविजेतेपद मिळविले होते.