तन्वी शर्मा दुसऱ्या फेरीत
वृत्तसंस्था/ कोरिया
कोरिया ओपन 2026 मध्ये भारतीय शटलर तन्वी शर्माने जर्पनच्या मानामी सुइझुचा 21-16, 12-21, 21-17 असा पराभव करुन दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
पहिल्या गेमध्ये तन्वीचे वर्चस्व होते, ती एकदाही पिछाडीवर पडली नाही. सुइसुने 14-14 अशी बरोबरी साधली होती, परंतु तन्वीने सामन्यावर नियंत्रण मिळवले आणि त्यानंतर केवळ दोन गुण गमावून पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेमध्ये सुइझुने 6-1 अशी जोरदार आघाडी घेतली. तन्वीने सलग पाच गुण मिळवून बरोबरी, मात्र 23 वर्षीय जपानी खेळाडूने संयम राखत 12-12 अशी बरोबरी कायम ठेवली आणि त्यानंतर सलग नऊ गुण मिळवत सामना निर्णायक तिसऱ्या गेमपर्यंत नेला.तिसरा गेम अत्यंत चुरशीचा झाला,ज्यामध्ये दोन्ही खेळाडूंनी आलटून-पालटून आघडी घेतली.अखेरीस तन्वीने 13-9 अशी आघाडी घेतली आणि सुइझुच्या पुनरागमनाच्या प्रयत्नांना रोखून सामना आपल्या नावावर केला.राउंड ऑफ 16 मध्ये तन्वीचा समाना जपानच्या हिना अकेचीशी होईल. यापूर्वी डिसेंबर 2025 मध्ये गुवाहाटी मास्टर्सच्या उपांत्य फेरीत तन्वीने अकेचीचा पराभव केला होता, तर मे 2026 मध्ये थायलंड ओपनमध्ये तिला अकेचीकडून पराभव लागला होता.
