For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एचसीएल स्क्वॅश चॅलेंजरमध्ये तन्वी खन्नाला जेतेपद

06:12 AM Jul 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
एचसीएल स्क्वॅश चॅलेंजरमध्ये तन्वी खन्नाला जेतेपद
Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

Advertisement

शुक्रवारी झालेल्या एचसीएल स्क्वॅश पीएसए चॅलेंजर टूर मुंबई स्पर्धेत भारताच्या तन्वी खन्नाने सुरुवातीला दोन गेम्स गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन करत इजिप्तच्या दुसऱ्या मानांकित फरीदा वालिदचा 3-2 असा रोमांचक पराभव केला आणि महिलांचे विजेतेपद पटकावले.

जागतिक क्रमवारीत 74 व्या स्थानावर असलेल्या आणि तिसऱ्या मानांकित तन्वीने 54 मिनिटांच्या लढतीत 8-11, 2-11, 12-10, 11-9, 11-7 असा विजय मिळवत उल्लेखनीय पुनरागमन केले. दिल्लीच्या या 29 वर्षीय खेळाडूचे पीएसए स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचल्यानंतरचे हे पाचवे विजेतेपद ठरले. पुरूषांच्या गटात मलेशियाच्या मोहम्मद स्याफिक कमालने विजेतेपद मिळवले. त्याने अंतिम सामन्यात इजिप्तच्या दुसऱ्या मानांकित यासिन शोहदीचा 6-11, 9-11, 11-8, 14-12, 11-8 असा पराभव केला.

Advertisement

अंतिम निकाल महिला : तन्वी खन्ना वि. वि. फरीदा वालिदा 3-2 (8-11, 2-11, 12-10, 11-9, 11-7). पुरूष एम. स्याफिक कमाल वि. वि. यासिन शोहदी (इजिप्त) 3-2 (6-11, 9-11, 11-8, 14-12, 11-8).

Advertisement
Tags :

.