For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अश्विनच्या जागी तनुष कोटियन टीम इंडियात

06:50 AM Dec 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
अश्विनच्या जागी तनुष कोटियन  टीम इंडियात
Advertisement

वृत्तसंस्था/ मेलबर्न 

Advertisement

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील उर्वरित दोन कसोटी सामन्यासाठी मुंबईचा युवा फिरकीपटू तनुष कोटियनचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. कोटियन मंगळवारी ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. 26 वर्षीय कोटियन सध्या अहमदाबादमध्ये मुंबईकडून विजय हजारे ट्रॉफी खेळत आहे. तो संघात नुकताच निवृत्त झालेल्या रविचंद्रन अश्विनची जागा घेणार आहे. यामुळे 26 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटीत त्याला प्लेईंग-11 मध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षर पटेलने वैयक्तिक कारण देत तिसऱ्या व चौथ्या कसोटीसाठी उपलब्ध नसल्याचे सांगितल्याने तनुष कोटियनला संधी देण्यात आली. गाबा कसोटीनंतर आर अश्विनने आंतरराष्ट्रीय निवृत्ती जाहीर केल्यानंतर निवडकर्त्यांना कोटियनचा समावेश करण्यास भाग पाडले आहे. गेल्या मोसमात रणजी करंडक विजेता आणि अहमदाबादमधील मुंबईच्या विजय हजारे करंडक संघाचा भाग असलेला कोटियन मंगळवारी मुंबईहून ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.

Advertisement

देशांतर्गत क्रिकेट वर्तुळात ऑफ स्पिनर असलेला मुंबईकर तनुष एक अव्वल अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. अलीकडेच बॉर्डर-गावसकर स्पर्धेआधी तनुषने भारत अ संघासोबत ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. मेलबर्नच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध त्याने 44 धावांची खेळी केली होती. याशिवाय, देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने आपल्या फिरकीने निवड समितीचे लक्ष वेधून घेतले आहे. यामुळे मेलबर्न कसोटीत त्याला प्लेईंग-11 मध्ये स्थान मिळते का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement
Tags :

.