Kolhapur : इचलकरंजीचा तन्मय मांडरेकर राज्यसेवा परीक्षेत ओबीसी प्रवर्गात राज्यात प्रथम
तन्मय मांडरेकर यांचा प्रेरणादायी प्रवास
by संजय खूळ
इचलकरंजी : राज्यसेवा मुख्य परीक्षेत येथील तन्मय राधिका अनिल मांडरेकर हा ओबीसी प्रवर्गात राज्यात पहिला तर सर्वसाधारण गुणवत्ता यादीत राज्यात सातवा आला. या परीक्षेत सलग दुसऱ्यांदा तन्मय यांने यश नाव लौकिक केले आहे
तन्मय याची नगरपरिषद मुख्याधिकारी वर्ग १ या पदावर नियुक्ती होणार आहे. जिद्द जोरावर आणि प्रतिकूल चिकाटीच्या आर्थिक परिस्थितीवर मात करीत राज्य सेवा मुख्य परीक्षेत इचलकरंजी येथील तन्मय यांनी मिळवलेले लख्ख यश कौतुकास्पद ठरत आहे.
मागील वर्षी जाहीर झालेल्या राज्यसेवा परीक्षेच्या निकालात पहिल्याच प्रयत्नात तन्मय याने राज्यात दहावा क्रमांक पटकाविला होता. परंतु यावर समाधान न मानता आणखीन यश मिळवायचे या उद्देशाने तन्मयचे वर्षभर प्रयत्न सुरू होते. आज जाहीर झालेल्या परीक्षेत तन्मयने यश मिळवून एक वेगळी झळाळी निर्माण केली आहे.
लहानपणीच वडिलांचे छत्र हरवलेल्या तन्मयला त्याच्या आईची मोठी साथ मिळाली. तन्मय या आई या अंगणवाडी सेविका आहेत. आई, बहीण आणि आजीसह एका छोट्याशा घरात राहणाऱ्या तन्मयने मोठे काहीतरी होण्याचे स्वप्न पाहिले होते. आपल्या मुलांनी लख्ख यश मिळवाव हे त्यांचं स्वप्न होतं आणि त्याप्रमाणेच त्यांनी या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले.
तन्मय याचे प्राथमिक शिक्षण जया आदिनाथ चौगुले प्राथमिक विद्यामंदिरात तर माध्यमिक शिक्षण सरस्वती हायस्कूल येथे झाले. व्यंकटेश महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला बारावीच्या सीईटी परीक्षेत चांगले गुण मिळाले या गुणाच्या आधारेच त्याला पुण्यातील सीओईपी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे पुण्यामध्ये जाऊन शिक्षण घेणे त्याला अशक्य होते.
अशावेळी अ. लाट (ता शिरोळ) येथील विद्यार्थी विकास प्रबोधिनी संचलित बालोद्यान संस्थेमार्फत अध्यक्ष कुलभूषण बिरनाळे यांनी तन्मय याच्या अभियांत्रिकी शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेतली होती. अमेरिकात स्थित विद्या कागल यांनी तन्मयच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. घरच्या परिस्थितीची जाणीव आणि जिद्द व चिकाटीच्या जोरावर तन्मय याने अभियांत्रिकीचे शिक्षण अत्यंत चांगल्या गुणांने उत्तीर्ण झाला.
राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून सनदी अधिकारी बनण्याचं त्याचं स्वप्न होतं. त्यामुळेच त्याने राज्यसेवा परीक्षेची तयारी सुरू केली. स्वतःच अभ्यास करत त्याने नोट्स काढले. कोणत्याही क्लासचा फारसा आधार न घेता दररोज १२ ते १४ तास तन्मय अभ्यास करत होता. राज्यसेवा परीक्षेत चांगले यश मिळवायचेच हे त्याचे ध्येय होते आणि त्याचे हे ध्येय आज साध्य झाले. मागील वर्षी राज्यसेवा परीक्षा मंडळाच्या वतीने ११७ जणांची यादी जाहीर झाली होती.
त्यामध्ये सर्वसाधारण गुणवत्ता यादीत तन्मय दहावा तर ओबीसी प्रवर्गात राज्यात चौथा क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. त्यानुसार त्याची गटविकास अधिकारी या पदावर नियुक्ती झाली होती. आज जाहीर झालेल्या निकालात ओबीसी प्रवर्गात राज्यात प्रथम येऊन तन्मयने आणखीन यश प्राप्त केले आहे आता तन्मयची मुख्याधिकारी अथवा उपायुक्त या पदावर नियुक्ती होणार आहे.