For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

12 सप्टेंबरला प्रदर्शित होणार ‘तणाव 2’

06:31 AM Jul 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
12 सप्टेंबरला प्रदर्शित होणार ‘तणाव 2’
Advertisement

अरबाज खान अन् मानव विज मुख्य भूमिकेत

Advertisement

लोकप्रिय वेबसीरिज ‘तणाव’ पुन्हा एकदा दमदार अॅक्शन आणि थ्रिलिंग अनुभवासोबत परतणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये यावेळी काय घडणार याची छोटी झलक दाखवत निर्मात्यांनी ‘तणाव 2’चा ट्रेलर जारी केला आहे.

मानव विज आणि अरबाज खान पुन्हा एकदा अॅक्शनने नटलेल्या सीरिजसोबत ओटीटीवर झळकणार आहेत. काश्मीरच्या अंतर्गत घटनांना दाखविणारी ‘तणाव’ वेबसीरिज इस्रायली शो ‘फौदा’चे भारतीय रुपांतरण आहे. या सीरिजचा पहिला सीझन 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्याला प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली होती. आता याच्या दुसऱ्या सीझनची झलक समोर आली आहे.

Advertisement

सोनी लिवने ‘तणाव 2’चा ट्रेलर शेअर करण्यासोबत याच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. या अॅक्शन पॅक वेबसीरिजमध्ये शौर्य, प्रेम, फसवणूक, सूड, प्रलोभने सर्व काही कंगोरे दिसून येणार आहेत. ही सीरिज ओटीटीवर 12 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Advertisement
Tags :

.