For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विमानतळांवरील उड्डाणांच्या जीपीएस डेटामध्ये छेडछाड

06:18 AM Dec 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
विमानतळांवरील उड्डाणांच्या जीपीएस डेटामध्ये छेडछाड
Advertisement

केंद्र सरकारची संसदेत माहिती

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

गेल्या काही दिवसात दिल्ली, कोलकाता, मुंबई, हैदराबाद, अमृतसर, बेंगळूर आणि चेन्नईसह देशातील अनेक प्रमुख विमानतळांवर जीपीएस स्पूफिंग आणि जीएनएसएस इंटरफेसच्या घटना नोंदवल्याची कबुली केंद्र सरकारने संसदेत दिली. या समस्येमुळे उपग्रह-आधारित नेव्हिगेशन प्रणालींमध्ये व्यत्यय झाल्यामुळे उड्डाण ऑपरेशन्सवर परिणाम होतो. गेल्या पंधरवड्यात असे प्रकार उघड झाले होते. याबाबत आतापर्यंत गोपनीयता बाळगली जात होती. मात्र, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी यासंबंधी प्रश्न उपस्थित झाल्यानंतर सरकारने यासंबंधीच्या वृत्ताला दुजोरा दिला.

Advertisement

नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी सोमवारी विमानतळांवरील जीपीएस डेटासंबंधीच्या प्रश्नाला उत्तर दिले. उपग्रह नेव्हिगेशनमध्ये व्यत्यय आला तरीही भारताचे विद्यमान किमान ऑपरेटिंग नेटवर्क पारंपरिक जमिनीवर आधारित नेव्हिगेशन आणि देखरेख प्रणालींवर अवलंबून असल्यामुळे सुरक्षितपणे उ•ाणे चालविण्यास सक्षम असल्याचे नायडू यांनी स्पष्ट केले. नोव्हेंबर 2023 मध्ये नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने सर्व विमान कंपन्या आणि विमानतळांना अशा घटनांची सक्तीने तक्रार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार कंपन्यांकडून त्यावेळीच माहिती पुरविण्यात आली होती, असेही ते पुढे म्हणाले.

जीपीएस स्पूफिंग म्हणजे काय?

जीपीएस स्पूफिंग हा सायबर हल्ल्याचा एक प्रकार आहे. हल्लेखोरांनी बनावट उपग्रह सिग्नल पाठवल्यामुळे विमान किंवा इतर जीपीएस-आधारित उपकरणे चुकीची ठिकाणे किंवा चुकीचा डेटा प्रदर्शित करतात. अशा परिस्थितीत विमानाच्या नेव्हिगेशन सिस्टमला खोटे स्थान, खोटे अलर्ट किंवा खोटे भूप्रदेश इशारे मिळू शकतात. अशा स्थितीत विमान त्याच्या खऱ्या मार्गापासून विचलित होऊ शकते किंवा सिस्टम प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या परिस्थिती प्रदर्शित करू शकते. अलीकडेच दिल्ली विमानतळाजवळील अनेक उड्डाणांना 60 नॉटिकल मैलांपर्यंत चुकीचा स्थान डेटा प्राप्त झाला होता. या व्यत्ययामुळे काही उड्डाणे खबरदारी म्हणून जयपूर किंवा लखनौ सारख्या जवळच्या विमानतळांवर वळवावी लागली होती.

Advertisement
Tags :

.