महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘तमनार’ला वन्यजीवन मंडळाची मान्यता

12:06 PM Nov 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक : सत्तरीत मोबाईल टॉवर्स, रिसॉर्ट उभारणार

Advertisement

पणजी : वीज खात्याच्या उसगाव तसेच मोले परिसरातील तमनार या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अखेर गोवा वन्य जीवन मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यामुळे हा प्रकल्प आता कार्यान्वित होण्यातला महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मंत्रालयात झालेल्या वन्यजीवन मंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सत्तरीत 5 ठिकाणी मोबाईल टॉवर्स उभारण्यासही परवानगी देण्यात आली. शिवाय गोवा वनविकास महामंडळातर्फे काही रिसॉर्ट उभारण्याचा प्रस्ताव होता, त्यालाही मंजुरी देण्यात आली.

Advertisement

सत्तरी, मोर्लेत रिसॉर्टस्

सत्तरीत तीन ठिकाणी, तसेच मोले अभयारण्यात देखील अशा पद्धतीचे नैसर्गिक व्यवस्था सांभाळून पर्यटकांसाठी आवश्यक कुटीरे उभारली जातील, या प्रकल्पालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली. नुकत्याच झालेल्या बैठकीस वनमंत्री विश्वजित राणे, आमदार डॉ. देविया राणे तसेच पर्यावरण खात्याचे अधिकारी व वन्य मंडळाचे इतर सदस्यही उपस्थित होते.

व्याघ्र क्षेत्रासंबंधी निर्णय नाही

गेले काही महिने गाजत असलेल्या राखीव व्याघ्र क्षेत्रासंदर्भातही या बैठकीत चर्चा झाली. परंतु कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. सध्याची स्थिती मंडळाच्या सर्व सदस्यांसमोर मांडण्यात आली. पुढील बैठकीत सविस्तर चर्चा करुन निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले आहे. वीज खात्याचा सर्वात महत्त्वाचा तमनार वीज प्रकल्प कर्नाटकातून वीज वाहिन्या गोव्यात आणून उसगाव येथे वीज फिडर उभारले जाणार आहे. हा गोवा वीज खात्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यातून गोव्याला मोठ्या प्रमाणात व सुरळीत आणि दर्जेदार वीजपुरवठा प्राप्त होणार आहे. गोवा वन्यजीव मंडळाने या प्रकल्पास मान्यता दिल्यामुळे या प्रकल्पाचे उर्वरित काम सुरू करणे आता शक्य होणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article