For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांगलादेश क्रिकेट मंडळ अध्यक्षपदी तमिम इक्बाल

06:11 AM Apr 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
बांगलादेश क्रिकेट मंडळ अध्यक्षपदी तमिम इक्बाल
Advertisement

वृत्तसंस्था, ढाका

Advertisement

बांगलादेश क्रिकेट मंडळाचा अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू 37 वर्षीय तमिम इक्बालची नियुक्ती करण्यात आली आहे. बांगलादेश शासनातर्फे सदर घोषणा मंडळवारी करण्यात आली.

नव्याने नियुक्त झालेल्या बांगलादेश शासनाने मंगळवारच्या बैठकीमध्ये यापूर्वी अस्तित्वात असलेल्या अमिनुल इस्लामच्या नेतृत्वाखालील बांगलादेश क्रिकेट मंडळ कार्यकारी संचालक मंडळ बरखास्त केले. यापूर्वी कार्यरत असलेल्या बांगलादेश क्रिकेट मंडळावर विविध भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले होते. आरोपांची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यांची चौकशी समिती नियुक्त केली होती. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये बांगलादेश क्रिकेट मंडळाची निवडणूक झाली होती.

Advertisement

बांगलादेश क्रिकेट मंडळाचे अध्यक्षपद भूषविणारा 37 वर्षीय तमिम इक्बाल हा सर्वात कमी वयाचा क्रिकेटपटू आहे. तमिम इक्बालच्या अध्यक्षतेखाली 11 सदस्यांची हंगामी समिती नियुक्त केली असून त्यामध्ये बांगलादेशचा माजी कर्णधार मिनाजुल अबेदिन, माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट समालोचक अतहर अली खान यांचा समावेश आहे.

Advertisement
Tags :

.