For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तामिळ थलैवाजचा बंगाल वॉरियर्सवर विजय

06:38 AM Feb 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
तामिळ थलैवाजचा बंगाल वॉरियर्सवर विजय
Advertisement

वृत्तसंस्था/ पंचकुला

Advertisement

2024 च्या प्रो-कबड्डी लिग हंगामातील रविवारी येथे झालेल्या सामन्यात नरेंद्र आणि विशाल चहल यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर तामिळ थलैवाजने बंगाल वॉरियर्सचा 74-37 अशा गुण फरकाने दणदणीत पराभव केला.

या सामन्यात तामिळ थलैवाजचे प्रमुख चढाईपटू नरेंद्रने 17 तर विशाल चहलने 18 गुण मिळविले. या सामन्यात तामिळ थलैवाजच्या कबड्डीपटूंनी आणखी एक नवा विक्रम केला असून त्यांनी विक्रमी 7 वेळा बंगाल वॉरियर्सचे सर्व गडी बाद केले. सामन्यातील चौथ्याच मिनिटाला तामिळ थलैवाजने 4-3 अशी आघाडी मिळविली होती. 13 व्या मिनिटाला बंगाल वॉरियर्सचे सर्व गडी तामिळ थलैवाजने बाद करुन 17-12 अशी मजबूत स्थिती निर्माण केली. 18 व्या मिनिटाला तामिळ थलैवाजचा संघ 22-15 तर मध्यंतरापर्यंत ते 31-18 असे आघाडीवर होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.