For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तमिळ सुपरस्टार विजयचा 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम' 5 सप्टेंबरला रिलीज होणार

03:48 PM Apr 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
तमिळ सुपरस्टार विजयचा  द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम  5 सप्टेंबरला रिलीज होणार
Advertisement

तमिळ सुपरस्टार विजयने गुरुवारी त्याचा आगामी फीचर फिल्म ‘द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम’ 5 सप्टेंबर रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली. हा साय-फाय ॲक्शन चित्रपट व्यंकट प्रभू यांनी दिग्दर्शित केला आहे आणि AGS एंटरटेनमेंटच्या अर्चना कलापाथी यांनी निर्मिती केली आहे. चित्रपटात दुहेरी भूमिका साकारणाऱ्या विजयने त्याच्या अधिकृत X पेजवर चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर केले आहे. पोस्टरमध्ये चित्रपटाच्या रिलीज डेटचा उल्लेख 'सप्टेंबर पाचवा' असा करण्यात आला आहे. ‘द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम’ मध्ये प्रशांत, प्रभुदेवा, स्नेहा, लैला, मीनाक्षी चौधरी, मोहन, जयराम, अजमल अमीर आणि योगी बाबू हे कलाकार देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. युवन शंकर राजा या चित्रपटाला संगीत देणार असून सिध्दार्थ नुनी हे छायाचित्रकार आहेत. लिओ, मर्सल, मास्टर आणि बिगिल यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखला जाणारा विजय ‘द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम’ च्या रिलीजनंतर पूर्णवेळ राजकीय प्रवेशासाठी सज्ज झाला आहे. फेब्रुवारीमध्ये, अभिनेत्याने त्याचा राजकीय पक्ष तमिझागा वेत्री कळघम (TVK) लाँच केला आणि 2026 ची तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढवण्याची योजना जाहीर केली.

Advertisement

Advertisement
Tags :

.