For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तामिळनाडूच्या मंत्र्याची पंतप्रधानांना धमकी

07:00 AM Mar 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
तामिळनाडूच्या मंत्र्याची पंतप्रधानांना धमकी
Advertisement

दिल्लीत गुन्हा दाखल : जाहीर सभेत वक्तव्य

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जाहीर सभेत धमकीवजा वक्तव्य केल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी तामिळनाडूचे मंत्री टी. एम. अंबारसन यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. अधिकाऱ्यांनी गुऊवारी ही माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाचे वकील सत्य रंजन स्वेन यांच्या तक्रारीच्या आधारे बुधवारी संसद मार्ग पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अंबारसन यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. एफआयआरनुसार, तामिळनाडू सरकारमधील ग्रामीण उद्योग, कुटीर उद्योग आणि लघु उद्योग मंत्री अंबारसन यांनी पंतप्रधान मोदींचे तुकडे करण्याची उघडपणे धमकी दिली आहे. दक्षिणेकडील राज्यातील एका जाहीर सभेत त्यांनी हे कथित वक्तव्य केले. “अंबारसन यांचे धमकीचे विधान केवळ चिंताजनकच नाही तर आपल्या पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वपूर्ण धोका आहे. त्यात जाणूनबुजून आपल्या देशाची शांतता आणि स्थिरता प्रभावित करण्याचा आणि हिंसाचार भडकावण्याचा हेतू आहे.” असे एफआयआरमध्ये म्हटले आहे. कलम 153 (दंगल भडकवण्याच्या हेतूने चिथावणी देणे), 505 (सार्वजनिक क्षोभ निर्माण करणारी विधाने), 506 (गुन्हेगारी धमकी) आणि भारतीय दंड संहितेच्या इतर कलमांखाली मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.