For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तामिळनाडूत ‘बाप मुख्यमंत्री, बेटा उपमुख्यमंत्री’

06:55 AM Sep 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
तामिळनाडूत ‘बाप मुख्यमंत्री  बेटा उपमुख्यमंत्री’
Advertisement

उदयनिधी स्टॅलिन यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ : सेंथिल बालाजीही मंत्रिमंडळात : सरकारमध्ये मोठे फेरबदल

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

तामिळनाडूच्या एमके स्टॅलिन सरकारच्या मंत्रिमंडळात रविवारी मोठा बदल करण्यात आला. ‘सनातन’वर वादग्रस्त वक्तव्य करणारे आणि राज्य सरकारमध्ये मंत्री असलेले त्यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच पुझल मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर मुक्त झालेले माजी मंत्री सेंथिल बालाजी यांचेही मंत्रिमंडळात पुनरागमन झाले आहे. याशिवाय डॉ. गोवी चेझियान, आर. राजेंद्रन आणि एस. एम. नस्सर यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. राजभवनात रविवारी सर्वांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली.

Advertisement

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी आपला मुलगा उदयनिधी स्टॅलिन यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. यासोबतच मंत्रिमंडळातही फेरबदल करण्यात आले. व्ही सेंथिल बालाजी, आर राजेंद्रन, डॉ. गोवी चेझियान आणि एस. एम. नस्सर यांना स्टॅलिन सरकारमध्ये मंत्री करण्यात आले आहे. रविवारी राज्यपाल आर. एन. रवी यांनी राजभवनात सेंथिल बालाजी यांच्यासह द्रमुकच्या चार नेत्यांना शपथ दिली. उदयनिधी हे आधीच राज्य सरकारमध्ये मंत्री असल्याने त्यांनी केवळ उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सरकारने मंत्रिमंडळात त्यांचा दर्जा वाढवला आहे. तामिळनाडूमध्ये वडील मुख्यमंत्री आणि मुलगा उपमुख्यमंत्रीपद भूषवत असल्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2009 ते 2011 दरम्यान विद्यमान मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन हे उपमुख्यमंत्री होते. त्याचवेळी त्यांचे वडील दिवंगत एम कऊणानिधी मुख्यमंत्री होते.

उदयनिधी स्टॅलिन यांना काय मिळाले?

उदयनिधी स्टॅलिन यांना उपमुख्यमंत्री म्हणून बढती देण्यात आली आहे. यासोबतच त्यांच्याकडे नियोजन आणि विकास खात्याचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहेआहे. उदयनिधी हे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र आणि प्रतिष्ठित द्रविडीयन नेते व तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री दिवंगत कऊणानिधी यांचे नातू आहेत. उदयनिधी हे गेल्या वषी सनातन धर्मावरील वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. त्यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू-मलेरियाशी केली होती.

धक्कादायक नाव सेंथिल बालाजी

तामिळनाडू सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारातील सर्वात आश्चर्यकारक नाव म्हणजे सेंथिल बालाजी. 14 जुलै 2023 रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना अटक केली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक झाल्यानंतर त्यांनी यावषी फेब्रुवारीमध्ये राजीनामा दिला होता. त्यांना 26 सप्टेंबरलाच सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. आता मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे ऊर्जा खात्याचा पदभार दिला आहे.  यापूर्वी त्यांच्याकडे उत्पादन शुल्क विभाग होता. द्रमुकच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंथिल बालाजी यांनी मुख्यमंत्र्यांना उत्पादन शुल्क विभागामध्ये रस नसल्याबद्दल सांगितले. त्यामुळे त्यांच्याकडे ऊर्जा विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.