For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डीएमके-काँग्रेस यांची तामिळनाडूत आघाडी

06:41 AM Mar 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
डीएमके काँग्रेस यांची तामिळनाडूत आघाडी
Advertisement

स्टॅलिन यांनी 2019 चा फॉर्म्युला स्वीकारला, काँग्रेसला 9 जागा

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तामिळनाडू-पुद्दुचेरीमध्ये काँग्रेस आणि द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) यांच्यातील आघाडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमधील जागावाटपाबाबत दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाले.  त्यानंतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीएमकेने 2019 च्या फॉर्म्युल्याची पुनरावृत्ती करत आपला मुख्य मित्र काँग्रेससाठी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात नऊ जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. तर शेजारच्या पुद्दुचेरीची एक जागाही देण्यात येणार आहे.

Advertisement

द्रमुकचे प्रमुख स्टॅलिन यांच्याशी जागावाटपासंबंधी झालेली चर्चा अतिशय सौहार्दपूर्ण होती, असे काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले. तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमधील जागावाटपाबाबत त्यांच्याशी करार झाला आहे. तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडी सर्व 40 जागा जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तामिळनाडूमधील 39 पैकी 9 जागांवर काँग्रेस आपले उमेदवार उभे करणार आहे. यासोबतच काँग्रेस पुद्दुचेरीतील एका जागेवर निवडणूक लढवणार आहे. त्याचबरोबर तामिळनाडूतील उर्वरित सर्व जागांवर काँग्रेस द्रमुक आणि आघाडीच्या पक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा देईल. या दोन्ही ठिकाणी जागावाटपाच्या सूत्रानुसार सीपीआय 2, सीपीएम 2, व्हीसीके 2, एमडीएमके 1, आययूएमएल 1, केएनएमके 1 (डीएमके चिन्हावर) जागा लढवणार आहे.

Advertisement
Tags :

.