For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ratnagiri News : ताम्हाणेत दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

11:55 AM May 27, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
ratnagiri news   ताम्हाणेत दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू
Advertisement

|
राजापूर : तालुक्यातील ताम्हाणे बनाचा माळ येथे झालेल्या भीषण दुचाकी अपघातात सिद्धेश शिवाजी भोस्तेकर (२९, रा. माणगाव, रायगड, सध्या रा. सांताक्रुज, मुंबई) यांचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ताम्हाणे रोडवर हा अपघात घडला. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिध्देश भोस्तेकर हे माणगाव येथून दुचाकीवरून ताम्हाणे येथील आपल्या सासुरवाडीला येत होते. ताम्हाणे रोडवरील बनाचा माळ परिसरात दुचाकीवरील ताबा सुटल्याने त्यांची दुचाकी समोरील चिरेबंदी कंपाऊंडच्या भिंतीवर जोरात आदळली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Advertisement

घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. तसेच राजापूर पोलीसही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक अमित यादव, उपनिरीक्षक सुधीर उबाळे तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कमलाकर पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक सुधीर उबाळे करत आहेत. 

Advertisement
Advertisement
Tags :

.