‘नो एंट्री 2’मध्ये तमन्ना दिसणार
वरुण धवन, अर्जुन, दिलजीत मुख्य भूमिकेत
नो एंट्री या चित्रपटाचा सीक्वेल तयार केला जाणार आहे. या चित्रपटात आता तमन्ना भाटियाचे नाव जोडले गेले आहे. तमन्नाला नो एंट्री 2 या चित्रपटात मुख्य अभिनेत्रींपैकी एक म्हणून निवडण्यात आले आहे. कॉमेडी धाटणीच्या चित्रपटात तिला यामुळे पुन्हा भूमिका साकारता येणार आहे.
2005 मधील हिट चित्रपटात बिपाशा बासूकडून साकारण्यात आलेल्या भूमिकेसारखी भूमिका तमन्ना नव्या चित्रपटात साकारणार आहे. अलिकडेच तमन्नाने ‘रेंजर’ चित्रपटाचे चित्रिकरण सुरू केले आहे. यात ती अजय देवगणसोबत दिसून येणार आहे.
नो एंट्री 2 चित्रपटात मुख्य भूमिकेत वरुण धवन, अर्जुन कपूर आणि दिलजीत दोसांझ हे अभिनेते दिसून येणार आहेत. जुन्या चित्रपटातील कलाकार सीक्वेलमध्ये दिसणार नसल्याची घोषणा निर्माते बोनी कपूरने यापूर्वीच केली असल्याने सलमान खान, अनिल कपूर आणि फरदीन खानच्या चाहत्यांची मात्र निराशा होणार आहे. नो एंट्री 2 चित्रपटाचे काम लवकरच सुरू होणार आहे. हा चित्रपट दिवाळीच्या आसपास प्रदर्शित केला जाऊ शकतो.