सिद्धार्थ मल्होत्रासोबत तमन्नाची जमणार जोडी
लवकरच सुरू होणार चित्रिकरण
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा हा स्वत:ची व्यक्तिरेखा प्रभावीपणे साकारण्यासाठी मोठी मेहनत घेण्यासाठी ओळखला जातो. सिद्धार्थच्या आगामी चित्रपटाची सध्या चर्चा सुरू असून याचे दिग्दर्शन दीपक मिश्रा करत आहे. आता या चित्रपटातील नायिकेचे नाव निश्चित झाले आहे.सिद्धार्थची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाचे नाव वन फोर्स ऑफ द फॉरेस्ट असून तो एक पौराणिक थ्रिलरपट आहे. याचमुळे या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटात आता सिद्धार्थची नायिका म्हणून तमन्ना भाटिया दिसून येणार आहे. तमन्ना स्वत:च्या अभिनयासोबत नृत्यकौशल्यासाठी ओळखली जाते. स्त्राr 2 चित्रपटातील तिच्या गाण्याला प्रेक्षक अन् चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता.
सिद्धार्थसोबत तिची जोडी जमणार असल्याने दोघांच्याही चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण लवकरच सुरू होणार आहे. तर पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित करण्याची निर्मात्यांची योजना आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थ आणि तमन्ना पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.