For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिद्धार्थसोबत जमणार तमन्नाची जोडी

06:29 AM May 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
सिद्धार्थसोबत जमणार तमन्नाची जोडी
Advertisement

सिद्धार्थ मल्होत्रा दीर्घकाळापासून स्वत:चा आगामी चित्रपट ‘वन-फोर्स ऑफ द फॉरेस्ट’वरून चर्चेत आहे. या चित्रपटात त्याची पहिल्यांदाच तमन्ना भाटियासोबत जोडी जमणार आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाचे पोस्टर जारी करत याची प्रदर्शनाची तारीख जाहीर केला आहे. हा चित्रपट आता 28 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. मध्य भारतच्या घनदाट जंगलांमध्ये चित्रित करण्यात आलेल्या चित्रपटात रोमांच, गुप्त मंदिरे आणि जुन्या कहाण्यांचे मिश्रण पाहता येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरने केली आहे.

Advertisement

तर दीपक मिश्रा आणि अरुणभ कुमार हे याचे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटाचे चित्रिकरण खऱ्याखुऱ्या वनक्षेत्रात करण्यात आल्याचे निर्मात्यांकडून सांगण्यात आले आहे. सिद्धार्थ मल्होत्रा यापूर्वी परम सुंदरी या चित्रपटात दिसून आला होता. या चित्रपटात त्याच्या नायिकेची भूमिका जान्हवी कपूरने साकारली होती. दिनेश व्हिजनच्या मॅडॉक बॅनर अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती झाली होती. तर तुषार जलोटा याचे दिग्दर्शक होते. तर तमन्ना ही पुढील काळात आणखी काही चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.