‘ओडेला 2’मध्ये तमन्ना
17 एप्रिलला होणार प्रदर्शित
तमन्ना भाटिया चित्रपटसृष्टीत स्वत:च्या सौंदर्य अन् उत्तम नृत्यासाठी ओळखली जाते. तमन्नाचा बहुप्रतीक्षित चित्रपट ओडेला 2 लवकरच प्रदर्शित होणार आहे. जेव्हा अंधकार पसरतो आणि आशा धूळीस मिळतात तेव्हा शिवशक्ति जागृत होते अशी कॅप्शन देत निर्मात्यांनी या चित्रपटाचे पोस्टर जारी केले आहे. या पोस्टरनुसार हा चित्रपट 17 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ओडेला फ्रँचाइजीचा दुसरा भाग आहे. तर पहिल्या चित्रपटाचे नाव ओडेला रेल्वेस्टेशन होते.
या चित्रपटाचे दिग्दर्शन राजीव नायर यांच्याकडून करण्यात आले आहे. या चित्रपटात तमन्ना ही एका साध्वीची भूमिका साकारत आहे. यात ती वेगळा लुक अन् व्यक्तिरेखेत दिसून येत आहे.
तमन्नाचा अलिकडेच विजय वर्मासोबत ब्रेकअप झाला आहे. यामुळे ती सध्या चर्चेत आहे. तमन्ना अन् विजय यांनी परस्परांचे मार्ग वेगवेगळे केले आहेत. तमन्ना या ब्रेकअपच्या दु:खातून बाहेर पडत पुन्हा स्वत:ला कामात बुडवून घेत आहे. तमन्नाचे अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत.