For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तमन्नाने सुरू केले ‘रागिनी 3’चे चित्रिकरण

06:24 AM Aug 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
तमन्नाने सुरू केले ‘रागिनी 3’चे चित्रिकरण
Advertisement

प्रसिद्ध दिग्दर्शक शशांत घोष सध्या ‘रागिनी 3’ हा चित्रपट दिग्दर्शित करत आहेत. या चित्रपटात तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. अलिकडेच तमन्नाने या चित्रपटाच्या चित्रिकरणाचे एक छायाचित्र शेअर करत चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढविली आहे.

Advertisement

तमन्नाने ‘रागिनी 3’च्या क्लॅप बोर्डासोबत एक खास छायाचित्र इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण 15 जुलैपासून सुरू झाले आहे. शशांक घोष यांनी यापूर्वी ‘वीरे दी वेडिंग’, ‘खुबसुरत’ यासारख्या गाजलेल्या चित्रपटांसोबत ‘फ्रेडी’ आणि ‘क्विक गन मुरुगन’ यासारखे चित्रपट दिले आहेत. तर रागिनी 3 या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर करत आहे.

आतापर्यंत एकता कपूरचा चित्रपट ‘रागिनी’चे दोन भाग प्रदर्शित झाले आहेत. आता एकता या फ्रेंचाइजीचा तिसरा चित्रपट घेऊन येत आहे. रागिनी 3 हा आगामी बॉलिवूड हॉरर-थ्रिलरपट आहे. तमन्ना भाटियासोबत या चित्रपटात जुनैद खान, नर्गिस फाकरी आणि आयुष शर्मा मुख्य भूमिकांमध्ये दिसून येऊ शकतात.

Advertisement

Advertisement
Tags :

.