For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बॉलिवूडमध्ये तमन्नाला 19 वर्षे पूर्ण

06:14 AM Mar 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
बॉलिवूडमध्ये तमन्नाला 19 वर्षे पूर्ण
Advertisement

काजल अग्रवालने केले अभिनंदन

Advertisement

तमन्ना भाटिया चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यास यशस्वी ठरत आहे. तिने हिंदी चित्रपटांसोबत तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तमन्नाने आता चित्रपटसृष्टीत 19 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त चाहत्यांसोबत आनंद व्यक्त केला आहे.

अभिनेत्री तमन्नाला बाहुबली चित्रपटामुळे वेगळी ओळख मिळाली. प्रेक्षकांनी या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे कौतुक केले होते. प्रेक्षकांनी मला आणि माझ्या चित्रपटांना प्रचंड प्रेम दिल्याने मी मनापासून आभार मानते असे तमन्नाने स्वत:च्या सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद केले आहे.

Advertisement

तमन्ना भाटिया आणि काजल अग्रवाल घनिष्ठ मैत्रिणी आहेत, चित्रपटसृष्टीत तमन्नाला 19 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त काजलने तिचे अभिनंदन केले आहे. तमन्ना चित्रपटसृष्टीत जवळपास दोन दशकांचा कालावधी पूर्ण करणार आहे, परंतु ही तर केवळ एक सुरुवात आहे. भविष्यासाठी तिला शुभेच्छा असे काजलने म्हटले आहे.

तमन्नाने 2005 साली ‘चांद सा रौशन चेहरा’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटानंतर ती अनेक चित्रपटांमध्ये दिसून आली. नेटफ्लिक्सचा लोकप्रिय शो ‘लस्ट स्टोरीज’मध्ये देखील तिने स्वत:च्या अभिनयाची जादू दाखवून दिली आहे. तमन्ना आगामी काळात ‘स्त्राr 2’ या चित्रपटात दिसून येणार आहे.

Advertisement
Tags :

.