‘रागिनी 3’मध्ये तमन्ना भाटिया
जुनैद खानसोबत जमणार जोडी
‘रागिनी 3’ चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक घोष करणार आहे. या चित्रपटात तमन्ना भाटिया ही अभिनेत्री दिसून येणार असून तिची जोडी आमिर खानचा पुत्र जुनैदसोबत जमणार आहे. आमिरचा पुत्र जुनैदने यापूर्वी काही चित्रपटांमध्ये काम केले असले तरीही याला यश मिळालेले नाही. यामुळे तो आता हॉररपटात काम करणार आहे.
रागिनी एमएमएस सीरिजच्या चित्रपटांमध्ये रोमान्स, विश्वासघात आणि हॉररचा डोस प्रेक्षकांना दिला जातो, असाच प्रकार तिसऱ्या भागातील चित्रपटात पहायला मिळणार आहे. साहिर रजा या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. रागिनी एमएमएस 3 चित्रपटात आणखी काही दिग्गज कलाकारांची वर्णी लागणार असून याचे चित्रिकरण लवकरच सुरू केले जाणार आहे.
रागिनी 3 चित्रपटासोबत तमन्ना भाटिया ही ‘व्ही. शांताराम’ यांच्या बायोपिकमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आहे. तसेच ती ‘वन’ हा भयपट देखील करत आहे. याचबरोबर ‘रेंजर’ नावाचा चित्रपट तिच्याकडे आहे. तमन्नासाठी चालू वर्षे अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून तिचे अनेक चित्रपट यंदा प्रदर्शित होणार आहेत.