तमन्ना अन् विजय वर्माचा ब्रेकअप
अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा हे चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध आणि प्रेमळ जोडप्यांपैकी एक होते. दोघेही दीर्घकाळापासून डेटिंग करत होते. अनेकदा त्यांना एकत्र पाहिले गेले होते. दोघेही विवाहाची तयारी करत असल्याची चर्चा होती. परंतु काही आठवड्यांपूर्वी दोघांनी ब्रेकअप केल्याचे समोर आले आहे.
तमन्ना अन् विजयने ब्रेकअपनंतर परस्परांबद्दल सन्मान आणि प्रेम दर्शविले आहे. ब्रेकअपनंतरही दोघेही चांगले मित्र राहणार आहेत. दोघेही स्वत:च्या कामावर लक्ष केंद्रीत करत आहेत आणि कठोर मेहनत करत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.
तमन्ना भाटिला अलिकडेच अनेक ठिकाणी एकटीच दिसून आली होती. 2023 मध्ये ‘लस्ट स्टोरीज 2’ प्रोजेक्टदरम्यान दोघेही एकत्र आले होते आणि तेथूनच त्यांचे रिलेशनशिप सुरू झाले होते. नात्यात बंधन असू नये असे वक्तव्य विजय वर्माने केले होते. तमन्ना ही विवाह लवकर करावा यासाठी आग्रही होती. तर विजय वर्मा विवाह लवकर न करण्याच्या मताचा होता, यातून निर्माण झालेल्या मतभेदांमुळे दोघांनी स्वत:च्या वाटा वेगवेगळ्या केल्याचे बोलले जात आहे.
विजय वर्मा यापूर्वी ‘आयसी 814 : द कंधार हायजॅक’मध्ये दिसून आला होता. याचबरोबर आणखी काही प्रोजेक्ट्समध्ये सध्या तो काम करत आहे. तर तमन्ना ही काही चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे.