कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘डू यू वाना पार्टनर’मध्ये तमन्ना अन् डायना

07:00 AM Sep 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि डायना पेंटी स्वत:ची आगामी कॉमेडी सीरिज ‘डू यू वाना पार्टनर’साठी एकत्र काम करत आहेत. यात दोन्ही अभिनेत्री अनेक अडचणींना सामोरे जात स्वत:चा स्टार्टअप सुरू करणाऱ्या मैत्रिणींच्या भूमिकेत आहेत. शिखा (तमन्ना) आणि अनाहिता (डायना) यांच्या आयुष्याची झलक दाखविणारा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. दोन्ही मैत्रिणी स्टार्टअपच्या जगतात पाऊल ठेवून स्वत:चा क्राफ्ट बीयर ब्रँड लाँच करतात, एका स्वप्नातील स्टार्टअपच्या शोधात एका गुंतलेल्या जाळ्यातून त्या कशा बाहेर पडतात हे यात दाखविले जाणार आहे.

Advertisement

ही सीरिज फीमेल फ्रेंडशिपला सेलिब्रेट करते. मैत्री, संघर्ष आणि सर्वात अजब विचारांना साकार करण्याच्या साहसाची ही कहाणी आहे. माझ्यासाठी शिखाची भूमिका साकारणे एक वेगळा अनुभव राहिला असल्याचे तमन्नाने म्हटले आहे.  कॉलिन डी कुन्हा आणि कुमार यांच्याकडून दिग्दर्शित या सीरिजची कहाणी नंदिनी गुप्ता, अर्श वोरा आणि मिथुन गंगोपाध्याय यांनी लिहिली आहे. या सीरिजमध्ये तमन्ना भाटिया, डायना पेंटीसोबत जावेद जाफरी, नकुल मेहता, श्वेता तिवारी, नीरज काबी, सूफी मोतीवाला आणि रणविजय सिंह महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. ही वेबसीरिज प्राइम व्हिडिओवर 12 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article