महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

नंदगड गवळीवाड्याच्या समस्यांची ता. पं.अधिकाऱ्यांकडून पाहणी

11:41 AM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ता. पं. कार्यनिर्वाहक अधिकाऱ्यांकडून समस्या सोडवण्याचे आश्वासन

Advertisement

खानापूर : तालुक्यातील नंदगडजवळील घनदाट जंगलात वसलेल्या गवळीवाड्याच्या समस्यांबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते सदानंद पाटील, पुंडलिक कारलगेकर यांनी सर्व वृत्तपत्रांना माहिती दिली होती. त्यामुळे वृत्तपत्रातून गवळीवाड्याच्या समस्यांबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. या वृत्ताची दखल घेत तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी विरनगौडर एगनगौडर तसेच नंदगड ग्रा.पं. चे विकास अधिकारी सागरकुमार बिरादार यांनी नुकतीच गवळीवाड्याला प्रत्यक्ष भेट देवून समस्यांची पाहणी केली. आणि समस्या सोडवण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून विविध खात्याच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना करण्यात आल्याची माहिती कार्यनिर्वाहक अधिकारी विरनगौडर एगनगौडर यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.

Advertisement

नंदगडपासून पाच कि. मी. अंतरावर असलेल्या गवळीवाडा अनेक समस्यांनी ग्रस्त होता. या गवळीवाड्यावर जाण्यासाठी रस्ता नाही. तसेच विद्युतपुरवठा नाही. अंगणवाडी नसल्याने लहान मुलाना सरकारी योजनेपासून वंचित रहावे लागत होते. विद्युतपुरवठा नसल्याने अंधारातच जीवन जगावे लागत हेते. तसेच शालेय विद्यार्थ्यांना जंगलातून पायवाटेने नंदगड येथे शाळेसाठी यावे लागत होते. तसेच जंगलात सर्व्हे नंबरमध्ये घरे असल्याने घरचा उतारा देण्यात येत नव्हता. तसेच रेशनकार्डही देण्यात आले नव्हते. या सर्व समस्यांबाबत नंदगड येथील जि. पं. माजी सदस्य पुंडलिक कारलगेकर आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सदानंद पाटील यांनी याबाबत पत्रकारांना माहिती दिली होती.

याबाबत वृत्तपत्रातून बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून ता. पं. कार्यनिर्वाहक अधिकारी विरनगौडर एगनगौडर यांनी गवळीवाड्यावर जाऊन सर्व समस्यांबाबत माहिती घेतली. आणि याबाबतचा अहवाल तयार करून संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना समस्या सोडवण्याबाबत सूचना केल्या आहेत. तसेच रेशनकार्ड आणि घरचा उतारा देण्यासाठी ग्रा. पं. विकास अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याची सूचना केली आहे.

ग्रा.पं. मध्ये ठराव करून उतारे देऊ

याबाबत नंदगड ग्रा. पं.चे विकास अधिकारी सागरकुमार बिरादार यांना विचारले असता ते म्हणाले, 15 जुलैनंतर ग्रा. पं. च्या बैठकीत ठराव मंजूर करून उतारे देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच रेशनकार्डसाठीही माहिती पुरवण्यात आली असल्याचे सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article