For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तालुका म. ए. युवा आघाडीतर्पे उद्या युवा मेळावा

10:59 AM Jan 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
तालुका म  ए  युवा आघाडीतर्पे उद्या युवा मेळावा
Advertisement

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण तालुका युवा आघाडीतर्फे आयोजित युवा मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून युवकांनी सीमालढ्याला बळकटी द्यावी, असे आवाहन ज्येष्ठ नेते शिवाजी हावळाण्णाचे यांनी केले. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त रविवार दि. 12 रोजी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व युवा आघाडीतर्फे महात्मा फुले रोड, शहापूर येथील मराठा सांस्कृतिक भवन येथे या मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्याच्या जागृतीनिमित्त नुकतीच शहापूर विभागात बैठक पार पडली. या बैठकीत युवा समिती सीमाभागाचे अध्यक्ष शुभम शेळके म्हणाले, 17 जानेवारी रोजी मध्यवर्ती म. ए. समितीने चलो कोल्हापूरचा नारा दिला. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने तरुणाई सहभागी होईल, यासाठी प्रत्येक विभागवार जागृती करणार असल्याचे सांगितले. यावेळी खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, राजू पाटील, अशोक घगवे, सूरज जाधव, रणजित हावळाण्णाचे, सचिन दळवी, भागोजी पाटील, विनय पाटील, ज्ञानेश चिकोर्डे, गौरव बाबली, ओमकार बैलूरकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.