महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काकती मराठी शाळा एसडीएमसीला तालुका आदर्श पुरस्कार

10:55 AM Sep 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर/काकती

Advertisement

काकती येथील सरकारी आदर्श मराठी शाळा एसडीएमसीला या वर्षीचा तालुका आदर्श एसडीएमसी पुरस्कार गांधी भवन, बेळगाव येथे झालेल्या समारंभात महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला. येथील एसडीएमसी कमिटीने मराठी शाळेचा सर्वांगीण विकासासाठी केलेले उल्लेखनीय कार्य, शाळेची रंगरंगोटी, मुलांना बसण्यासाठी बाक, संगणक कक्ष, जिजाऊ सभागृह, स्वच्छतागृह क्रीडा साहित्य, शाळा व मुलांच्या सुरक्षितेसाठी सीसी कॅमेरे, मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सेमिनार, शिक्षणप्रेमी, हिंडाल्को इंडस्ट्रिज, टायर सेल्स कंपनी अशा देणगीदारांच्या औदार्यातून शाळेची आधुनिकता सुसज्ज झाली आहे. या कार्याची ओळख म्हणून हा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार स्वीकारताना एसडीएमसी अध्यक्ष अनिल गवी, उपाध्यक्ष सोनम टुमरी, सदस्या सोनाली गवी, अर्चना टुमरी, सरिता कोचेरी, लक्ष्मी बसरीकट्टी, नम्रता परमोजी, सचिन गवी, मुख्याध्यापक किरण करंबळकर, शिक्षकवृंद उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article