For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्वात उंच अभिनेत्री

06:23 AM Dec 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
सर्वात उंच अभिनेत्री
Advertisement

उंची पाहून घाबरतात लोक

Advertisement

ज्या लोकांची उंची कमी असते, ते अनेकदा एखादा चमत्कार होऊन एका रात्रीत उंची वाढावी अशी इच्छा करत असतात. परंतु जे लोक अधिक उंच असतात त्यांना स्वत:ची उंची कमी असावी असे वाटू शकते. अशीच एक महिला  सर्वाधिक उंचीची अभिनेत्री असून तिला पाहून लोक घाबरून जातात. तर दुसरीकडे तिला कपड्यांपासून जोडीदार शोधण्यापर्यंत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

कॅलिफोर्नियाच्या वॉलनट क्रीक येथे राहणारी 36 वर्षीय लिंड्से के हेवर्डची उंची पाहून लोक घाबरून जातात. लिंड्से ही 6 फूट 8 इंच उंचीची असून 2013 मध्ये ती जगातील सर्वात उंच अभिनेत्री ठरली होती. लिंड्सने रेस्लिंगमध्ये ‘आयसिस द अमेझिंग’ रिंग नेमद्वारे स्वत:च्या कारकीर्दीची सुरुवात केली होती. अधिक उंचीमुळे तिला चित्रपटांमध्ये अभिनय, स्टंट इत्यादी कामे मिळून जातात. याचबरोबर अधिक उंचीचा फायदा तिला रेस्लिंगमध्ये झाला असून ती डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये स्थान मिळवून आहे, तरीही तिच्या वैयक्तिक आयुष्यात समस्या आहेत.

Advertisement

वयाच्या 36 व्या वर्षातही तिला स्वत:च्या आकाराचे कपडे शोधण्यासाठी मेठी धडपड करावी लागते. याचबरोबर तिची उंची पाहून न घाबरणारा पुरुष तिला भेटत नाही. यामुळे ती डेटिंग करू शकत नाही. अनेक लोकांनी तिची उंची पाहून तिला नकार दिला आहे. अभिनय, स्टंट आणि रेस्लिंगनंतर ती आता अन्य महिलांना प्रेरित करण्याचे काम करत आहे.

लोकांच्या टोमण्यांमुळे मी वैतागून केले होते. प्रत्येकजण मी इतकी उंच कशी असे विचारायचे. अनेक लोक मला बास्केटबॉल खेळण्याचा सल्ला द्यायचे. जेव्हा मला एखादा ड्रेस आवडतो, तेव्हा तो मी परिधान करू शकत नाही. कारण माझ्या आकाराचा ड्रेस सहजपणे उपलब्ध होत नाही असे ती सांगते. लिंड्से ही ग्रे एनाटॉमी, डब्ल्यूडब्ल्यूई नेक्स्ट, आर100 आणि द इंटर्नशिप गेम्समध्ये दिसून आली आहे.

Advertisement
Tags :

.