Kolhapur : फोनवर बोलणं पडलं महागात! शिरोली औद्योगिक वसाहतीतील दोन युवा उद्योजकांत जोरदार हाणामारी
उद्योजकांचा तुफान खडाजंगी! MIDC परिसरात तणाव वाढला
पुलाची शिरोली : मोटरसायकल रस्त्यात थांबवून मोबाईलवर बोलत असल्याचे कारणावरून शिरोली औद्योगिक वसाहतीतील दोन युवा उद्योजकांची एकमेकाना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण. तर फॉर्च्यूनर गाडीचे मोठे नुकसान. क्षुल्लक कारणावरून दोन युवा उद्योजक एकमेकांना भिडल्याची औद्योगिक वसाहतीतील हि पहिलीच घटना. याबाबत शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
शिरोली औद्योगिक वसाहतीमधील दत्त फॉन्ड्री समोर मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अमर प्रताप पाटील वय ३६ रा. पाटील गल्ली पुलाची शिरोली ता. हातकणंगले. हा मोटरसायकल वरून आपल्या कारखान्याकडे जात होता.फोन आलेने रस्त्याच्या कडेला बोलत थांबला होता.दरम्यान रोहित बोडके वय -३४ रा. मुळगाव निगवे, सध्या रा.कोल्हापूर हे दत्त फौंन्ड्री या स्वतःच्या कंपनीत आपल्या फॉर्च्यूनर गाडी (क्र. MH09-FG-1122) ने जात असता त्याने अमर पाटील यास तू रस्त्यावर का बोलत उभारला आहेस बाजूला हो असे धमकावले. व बोडके दत्त फौंन्ड्री जवळ गेले असताना पाटील यांने तेथे जावून काय झाले मी रोडच्या कडेला फोनवर बोलत होतो. असे समजावून सांगत असताना रोहित बोडके याने पाटील यास शिवीगाळ केली व लाथाबुक्यांनी मारहाण केली. अशी फिर्याद फिर्याद अमर पाटील याने दिली आहे .
तर रोहित सुनिल बोडके याने अमर पाटील यास आपण मोटरसायकल रस्त्याच्या कडेला थांबवून फोनवर बोल असे सांगून ते आपले दत्त फौंड्री जवळ आले. त्यानंतर अमर पाटील याने रोहीत बोडके यास दत्त फौंड्री येथे येवून बोडके यास शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. व जवळच पडलेल्या लाकडी ओंडक्याने बोडके यांची फॉर्च्यूनर गाडीची पुढील बाजूची व उजव्या बाजूची काच फोडली असे बोडके यानी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. या परस्परविरोधी फिर्यादी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.