महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

धरणनिर्मितीसाठी तालिबानला हवी भारताची मदत

06:34 AM Dec 24, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पाकिस्तानचा प्रकल्पाला विरोध : कुनार नदीवर धरण, जलविद्युत प्रकल्पाचा प्रस्ताव

Advertisement

वृत्तसंस्था/ काबूल

Advertisement

अफगाणिस्तानातील तालिबानी राजवट चित्राल नदीवर (कुनार नदी) धरण निर्माण करू पाहत आहे. धरण निर्मितीसाठी भारतीय कंपनीची मदत मागणार असल्याची घोषणा तालिबानने केली आहे. धरणामुळे 45 मेगावॅट विजेची निर्मिती होऊ शकेल आणि 34 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. तालिबानच्या या घोषणेनंतर पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे.

पाकिस्तानचा या प्रकल्पात समावेश न करता तालिबानने या धरणाच्या निर्मितीच्या दिशेने पावले टाकल्यास हे एकप्रकारे युद्धच मानल जाईल अशी धमकी बलुचिस्तानचे मंत्री जान अचकजई यांनी दिली आहे. चित्राल नदीवर धरण निर्माण करण्यात आल्यास खैबर पख्तूनख्वा प्रांतात पाण्याची समस्या निर्माण होणार आहे. चित्राल ही काबूल नदीची उपनदी आहे.

पाकिस्तानवर पडणार प्रभाव

पाकिस्तानात सिंधू नदी ही 18 कोटीहून अधिक लोकांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत आहे. सिंधूच्या पाच मुख्य उपनद्यांमध्ये काबूल नदी देखील सामील आहे. तर कुनार ही काबूल नदीची उपनदी आहे. कुनारच्या पात्रातील पाणी घटल्याचा प्रभाव  सिंधू नदीवर पडणार आहे. पाकिस्तानची 80 टक्के लोकसंख्या सिंधू नदीच्या खोऱ्यात राहते. कुनार नदी खैबर पख्तूनख्वामधून बाहेर पडत पाकिस्तान आणि पूर्व अफगाणिस्तानातून वाहते. याचा स्रोत हिंदूकुश पर्वताच्या दक्षिण भागात आहे. अखेरच्या टप्प्यात ही नदी नांगरहार प्रांतात काबूल नदीत सामावून जाते.

एक दशकापूर्वी करार, विश्वासघात

ऑगस्ट 2013 मध्ये नवाज शरीफ पंतप्रधान असताना पाकिस्तानने अफगाणिस्तान सोबत 22,400 कोटी रुपयांच्या निधीतून चित्राल नदीवर 1200 मेगावॅटच्या जलविद्युत प्रकल्पासाठी करार केला होता.  परंतु पाकिस्तानने नंतर हा करार गुंडाळत दासू धरण निर्मितीवर भर दिला होता. हे धरण सध्या खैबरमध्ये सिंधू नदीवर निर्माणाधीन आहे. पाकिस्तानच्या या कृतीला अफगाणिस्तानने विश्वासघात मानले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article