For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोन हजाराची लाच घेताना सापडला तलाठी

03:56 PM Sep 11, 2025 IST | Radhika Patil
दोन हजाराची लाच घेताना सापडला तलाठी
Advertisement

एकंबे :

Advertisement

कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागातील बोरगाव येथील तलाठी रणजित अर्जुन घाटेराव (वय ३२, रा. अहिरे कॉलनी, सातारा) याला सातारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना दि. ९ सप्टेंबर रोजी रंगेहाथ पकडले.

या प्रकरणी रहिमतपूर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बोरगाव नजीकच्या टकले, (ता. कोरेगाव) येथील गट क्रमांक १०० मधील ९० गुंठे शेती वारस नोंदीसाठी घाटेराव याने दोन हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने अगोदरच एक हजार रुपये दिले होते. उर्वरित एक हजार रुपयांची मागणी सुरूच असल्याने तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे धाव घेतली होती. त्यानुसार, तक्रारी चर्चा पडताळणी करून सापळा रचण्यात आला. कारवाईदरम्यान तलाठी रणजित घाटेराव याने एक हजार रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वीकारली. त्याचवेळी त्याला पकडण्यात आले. घाटेराव याच्या विरोधात विरुद्ध रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले व पोलीस उपअधीक्षक राजेश वसंत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल पाटील, हवालदार नितीन गोगावले, निलेश राजपुरे, सत्यम थोरात व अजयराज देशमुख यांनी कारवाई केली.

Advertisement
Tags :

.