For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Tasgaon Crime | तासगावात अपघाताचा फायदा घेत सोन्याच्या साखळ्या पळवल्या; मदने वस्तीतील चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

02:00 PM May 03, 2026 IST | NEETA POTDAR
tasgaon crime    तासगावात अपघाताचा फायदा घेत सोन्याच्या साखळ्या पळवल्या  मदने वस्तीतील चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Advertisement

             अपघातातील जखमींची लूट; तासगाव पोलिसांनी टोळीचा पर्दाफाश

Advertisement

तासगावः अपघातातील जखमींना मदत न करता जखमी पती-पत्नी यांच्या गळयातील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीचा तासगांव पोलीसांनी छडा लावला आहे. तर त्यांच्याकडून ५ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. अशी माहिती पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि.२७ एप्रिल रोजी सायंकाळी ९ च्या दरम्यान विकास मोडन पाटील रा.व्यवसाय दुकानदारी रा. भांबर्डे, ता. खानापूर हे त्यांच्या एर्टिगा गाडी नं. एमएच-१०-सीए-३४२३ मधून आपल्या पत्नीसह विटा रोडने तुरची या ठिकाणी जात होते. बोरगांव गावचे हद्दीत मदने मळा येथे त्यांचे कारची रोड लगत उभे असलेल्याआयशर ट्रकला धडक बसून अपघात झाला. या अपघातात विकास पाटील व त्यांच्या पत्नी हे दोघे ही जखमी झाले. त्यावेळी अपघातस्थळी जावुन त्यांना मदत न करता जखमी विकास पाटील यांच्या गळयातील ५ लाख रूपयेची ५ तोळेची सोन्याची चेन व त्यांच्या पत्नींच्या गळ्यातील १ लाख ८० हजार रूपयांचे १८ ग्रॅमचे मिनी मंगळसुत्र असे ६ लाख ८० हजार रूपयांचे सोन्याचे दागिने डिसका मारून तोडून नेले होते.

Advertisement

याप्रकरणी विकास पाटील यांनी चार अनोळखी इसमाविरूध्द तासगांव पोलीसात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलीस ठाणेत चैन स्नॅचिंगचा गुन्हा नोंद झाला होता.तासगांव पोलीसांनी गोपनिय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार शरद दिनकर मदने-२३, भरत दिनकर मदने-२१,आनंदा बाळासो मदने-३१, अतुल दादासो मदने-२५ सर्व रा. मदने । वस्ती, लिंब, ता. तासगांव यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी जखमींच्या गळ्यातील सोन्यांचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली व त्यांच्याकडून ५ लाख रूपये । किमतीची ५ तोळे वजनाची सोन्याची होलो चेन पोलीसांनी जप्त केली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक । तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले, स्था.गु.अ.शाखेचे संजीव झाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल टकले, सपोनि दिपक पाटील, पोहेकों अभिजीत गायकवाड, बजरंग बोरात, अमर सुर्यवंशी, सुरेश भोसले, पोशि. विवेक यादव, सुरज जगदाळे, संतोष माळी, सागर पाटील, तानाजी शिंदे, यांनी केली.

Advertisement
Tags :

.