For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रिंगरोडसह फ्लायओव्हरचे काम हाती घ्या

12:00 PM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
रिंगरोडसह फ्लायओव्हरचे काम हाती घ्या
Advertisement

खासदार शेट्टर यांची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

Advertisement

बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघातील महामार्गांच्या प्रस्तावांना मंजुरी द्यावी. तसेच इतर विकासकामांसाठी खासदार जगदीश शेट्टर यांनी सोमवारी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली. बेळगावच्या रिंगरोडसोबतच फ्लायओव्हरच्या कामांना गती देण्याची मागणी त्यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. बेळगाव तालुक्यातील झाडशहापूर ते होनगा यादरम्यान होऊ घातलेल्या रिंगरोडच्या कामासाठी भू-संपादनाचे काम तातडीने हाती घ्यावे. त्याबरोबरच बेळगावमधील शगनमट्टी-हुनगुंद-रायचूर या मार्गासाठी वेळेत भू-संपादन करावे. बेळगावच्या महामार्गापासून राणी चन्नम्मा चौकापर्यंत फ्लायओव्हर बांधण्याचा प्रस्ताव असून या कामासाठी 600 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठविला असून या प्रस्तावाला मंजुरी द्यावी, अशी मागणी गडकरी यांच्याकडे करण्यात आली.

गोकाक धबधब्यावर केबल कार

Advertisement

बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यात जगप्रसिद्ध असा धबधबा आहे. या धबधब्याच्या ठिकाणी पर्यटन वाढीसाठी केबल कारची व्यवस्था करावी. कर्नाटक सरकारने हा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला असून केंद्राने मंजुरी देणे बाकी आहे. याबरोबरच कित्तूर ते बैलहोंगल या रस्त्यासाठी 160 कोटी रुपये मंजूर करावेत, यासह इतर मागण्या गडकरी यांच्याकडे करण्यात आल्या. यावेळी अधिकाऱ्यांशी चर्चा करून विकासकामांना मंजुरी देण्याचे आश्वासन खासदार शेट्टर यांना दिले.

Advertisement
Tags :

.