तिळगुळ घ्या नि नदी वाचवा, पर्यावरण सांभाळा
सरूड येथील शिव - शाहू महाविद्यालयातील युवतींनी केली जनजागृती
सरूड प्रतिनिधी
तिळगुळ घ्या नि नदी वाचवा.असा संदेश देत हाती तिळगुळ व नदी संवर्धनाचे पत्रक देणाऱ्या महाविद्यालयीन युवती आज सोमवारी सकाळी सरूडच्या बाजारपेठेत जनजागृती करीत होत्या.निमित्य होते सरूड येथील श्री शिव शाहू महाविद्यालयच्या सामाजिक उपक्रमांचे.मकर संक्रांतीचे औचित्य साधून तिळगूळ वाटप करताना गोड बोला नि कडवी नदीचे संवर्धन करा अशी समाजभान जपणारी शुभेच्छा देण्यास येथील युवती बस थांबा व रिक्षा थांबा मधील प्रवासी, दूकानदार व हाँटेलमील ग्राहक व मालक यांना भेटत होत्या. या शुभेच्छातुन त्यांनी कडवी नदी संवर्धनाचे महत्व पटवुन देत नागरिंकामध्ये जनजागृती केली . पंचमहाभूतांच्या संर्वधनात प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज युवतींनी सादर केलेल्या पथनाट्यातून मांडण्यात आली.
यावेळी महाविद्यालये प्राचार्य डॉ.एच. टी .दिंडे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी अमृतवाहीनी कडवी नदी संवर्धन समितीचे प्रमुख राजेंद्र लाड ( आंबा ) म्हणाले,स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शाहूवाडी ची जीवनवाहीनी व इतिहासाची साक्ष असलेली कडवी नदी अमृत वाहीनी म्हणून संरक्षित करण्यासाठी तरूणाईने पुढाकार घ्यावा.कोल्हापूर येथील डॉ.व्ही.टी.पाटील फाऊंडेशनच्या सहयोगातून नदीकाठ संवर्धित करण्याचे काम हाती घेतले आहे.यावेळी डॉ.प्रकाश वाघमारे , प्रा. प्रकाश नाईक , रघुनाथ मुंडळे यांनी मनोगते मांडली . प्रबोधन पथकात सानिका पोवार, राजश्री पाटील, जानवी पाटील,प्राची घोलप, प्रतीक्षा माळी, काजल तळप ,सायली पाटील, तेजस्विनी नांदगोडे सहभागी होत्या.प्रा.दादासाहेब श्रीराम, डॉ.नवनाथ गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार प्रा . कुंडलिक पाटील यांनी मानले .