For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधानांच्या सेवा संकल्पनेला जनमानसात पोहोचवा : मुख्यमंत्री

07:01 AM Aug 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधानांच्या सेवा संकल्पनेला  जनमानसात पोहोचवा   मुख्यमंत्री
Advertisement

17 सप्टेंबरपासून राज्यात ‘सेवा संकल्प अभियान’

Advertisement

प्रतिनिधी / पणजी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवा समर्पणाच्या 25 वर्षांनिमित्त देशभरात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियान’चा भाग म्हणून गोव्यात दि. 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Advertisement

पंतप्रधानांच्या 25 वर्षांच्या समर्पित सार्वजनिक सेवेच्या प्रवासानिमित्त राबविण्यात येणाऱ्या या अभियानाच्या नियोजनासाठी नुकत्याच पणजीत झालेल्या बैठकीत तयारीवर सखोल चर्चा करण्यात आली. येथील गोमंतक मराठा समाज सभागृहात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अभियानाच्या नियोजनाचा आढावा घेतला.

मुख्यमंत्री म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवा संकल्पनेला पुढे नेण्यासाठी ‘विकसित भारत’ आणि ‘स्वयंपूर्ण गोवा’ घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे. बैठकीस महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञानमंत्री आशिष शेलार, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, खासदार सदानंद तानावडे, यांच्यासह अन्य मंत्री, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. पंतप्रधानांच्या ‘सेवा, समर्पण आणि राष्ट्रनिर्माण’ या भावनेचा संदेश जनमानसात पोहोचविण्यासाठी सदर कालावधीत विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

Advertisement
Tags :

.