कळंबा तलाव दूषित करणाऱ्यांवर कारवाई करा
कोल्हापूर :
येथील कळंबा तलावात मिसळण्राया कात्यायनी डोंगरातून येण्राया मुख्य ओढ्यात चिकन, मटणाचे वेस्टेज टाकताना काही दिवसांपूर्वी येथील मटण विक्रेत्यांना स्थानिक युवकांनी रंगेहाब पकडले. तसेच या परिसरात दुकान असण्राया मटण विक्रेत्यांना तरुणांनी जाब विचारण्यात आला होता. तसेच ओढ्यात टाकलेले मटणाचे वेस्टेज पुन्हा त्यांना बाहेर काढायला लावले. त्याचबरोबर संबंधित मटण विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन कळंबा बचाव कृती समिती यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी प्रमोद माने यांना व कळंबा ग्रामपंचायत प्रशासनाला दिले आहे. या निवेदनात असे म्हंटले आहे की शहरालगत असणारा कळंबा तलाव सध्या पाणी प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. पाणलोट क्षेत्रातील हॉटेल, मंगल कार्यालय, फार्म हाऊस, कृषी पर्यटन केंद्र यांचे सांडपाणी थेट कळंबा तलावात मिसळणारे ओढे, नाले यामध्ये सोडले जात आहे. त्यामुळे कळंबा तलावाचे पाणी प्रदूषित होण्यास सुरुवात झाली आहे. तसेच कळंबा येथील मटण विक्रेत्यांना तलावाच्या पाणलोट क्षेत्रातील पॉवरग्रेड जवळील असलेल्या ओढ्यामध्ये बकरीचे टाकाऊ हाडे, व तसेच कोंबडी यांचे अनेक घटक या ओढ्यामध्ये टाकण्यात आले आहेत. या विक्रेत्यांला रंगेहाथ पकडून जाब विचारला आहे. हा प्रकार कित्येक दिवसांपासून चालत आलेला आहे. असे पकडलेल्या स्थानिक नागरिकांनी सांगितला आहे. या प्रकारामुळे तलावातील मासे व इतर किटक व जिव यांना धोका उद्भवत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी तलावातील शेकडो मासे मृत्यु पडलेले आहेत ही सध्य स्थिती आहे. तसेच मटण व चिकन यासारखे टाकाऊ घटक थेट पाण्यात टाकल्यामुळे पाणी दूषित होत आहे. संबंधित विक्रेत्यावर कडक कारवाई करण्यात यावी असे निवेदनात म्हंटले आहे. यावेळी निवेदन देताना कळंबा बचाव कृती समितीचे प्रकाश टोपकर, संग्राम जाधव, लक्ष्मण जाधव सुहास निकम, नामदेव साळोखे, अमर पाटील, रोहित निकम आदी उपस्थित होते.