For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

वृत्तपत्राचे महत्व घ्या लक्षात

06:03 AM Oct 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
वृत्तपत्राचे महत्व घ्या लक्षात
Advertisement

अलिकडच्या काळात वृत्तपत्र वाचण्याची लोकांची सवय कमी झाली आहे, असे दिसून येत आहे. तथापि, वृत्तपत्र नियमितपणे वाचणे किती लाभदायक ठरु शकते,  याचा अनुभव ब्रिटनमधील एका व्यक्तीला नुकताच आला आहे. ब्रिटनच्या वोकिंग या नगरात एक निवृत्त डेकोरेटर वास्तव्यास असतात. त्यांच्याकडे जुन्या ‘पोकेमॉन कार्डां’चा मोठा संग्रह होता. या संग्रहाचे काय करायचे हे त्यांना कळत नव्हते. त्यामुळे त्यांनी तो त्यांच्या कपाटात तसाच ठेवून दिला होता. हा संग्रह त्यांना कोट्याधीश बनविणार आहे, याची त्यांना किंचितही कल्पना नव्हती. हा संग्रह म्हणजे त्यांना केवळ ‘रद्दी’ वाटत होती. तथापि, याच संग्रहाने त्यांचे भाग्य फळफळले आहे.

Advertisement

हा लाभ होण्यासाठी त्यांना वृत्तपत्रातील एक वृत्त उपयोगी ठरले आहे. हे वृत्त वाचल्यानंतर त्यांना असे समजले की, जुन्या पोकेमॉन कार्डांना लिलावात प्रचंड किंमत मिळते. एका कार्डाला जवळपास 6 हजार पौंड किंवा भारतीय रुपयांमध्ये जवळपास सहा लाख रुपये मिळू शकतात. हे वृत्त वाचताक्षणीच त्यांना आपल्याकडील पोकेमॉन कार्डांच्या संग्रहाची आठवण झाली. त्यांनी ही कार्डे विकण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ब्रिटनमधील प्रसिद्ध लिलाव कंपनी असणाऱ्या ‘एवबँक ऑक्शन हाऊस’शी संपर्क साधला. गेल्या बुधवारी त्यांच्या सर्व पोकेमॉन कार्डांचा लिलाव करण्यात आला आणि त्यांना या विक्रीतून तब्बल 15.6 लाख पौंडस्ची प्राप्ती झाली आहे. भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम जवळपास 20 कोटी रुपये इतकी होते. त्यांनी ही कार्डे 1990 पासून विकत घेण्यास प्रारंभ केला होता. त्यावेळी त्यांचा पुत्र लहान होता. त्यासासाठी ते ही कार्डे विकत घेत असत. ती त्यांना चांगली वाटत. त्यामुळे त्यांनी ती साठविली. आज ती त्यांच्या उपयोगी पडली आहेत. पण याला कारणीभूत वृत्तपत्र आहे, ही बाब विशेष महत्वाची आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.