For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भटक्या समाजाच्या विकासासाठी त्वरित पावले उचला

10:31 AM Feb 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
भटक्या समाजाच्या विकासासाठी त्वरित पावले उचला
Advertisement

फेडरेशन ऑफ एससीएसटीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन

Advertisement

बेळगाव : भटक्या समाजाच्या विकासासाठी सरकारकडून अनेक घोषणा करण्यात येत असल्या तरी त्याची पूर्तता केली जात नाही. त्यामुळे या समाजातील नागरिकांची ससेहोलपट होत आहे. या नागरिकांना सरकारने त्वरित दिलासा द्यावा, त्यांच्या विकासासाठी त्वरित पावले उचलावीत, अशा मागणीचे निवेदन अनुसूचित, जाती जमाती भटकी विमुक्त संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. राज्यातील 151 अनुसूचित-जाती जमातीपैकी 74 भटक्या जाती समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिल्या आहेत. या समाजाच्या विकासासाठी सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे. मात्र त्याची पूर्तता करण्यात आलेली नाही. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासापासून हा समाज दूर राहिला आहे. यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे. मात्र त्यानुसार विकास होत नसल्याचे दिसून येत आहे. सत्येवर आलेल्या आजपर्यंतच्या सरकारांकडून केवळ आश्वासन देऊन वेळ मारून नेण्याचे काम करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा

Advertisement

याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली आहे. मात्र कोणतीच तरतूद करण्यात आलेली नाही. राज्यात सत्तेवर आलेल्या सरकारकडून अपेक्षित प्रमाणात भटक्या समाजाच्या विकासासाठी आर्थिक मदत देण्यात येत नसल्याने समाजाचा विकास खुंटला आहे. सरकारने त्वरित यावर निर्णय घेऊन भटक्या समाजाच्या विकासासाठी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.