महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बाळांनो, आपल्या डोळ्यांची काळजी घ्या

11:34 AM Oct 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आज जागतिक दृष्टीदिन : मोबाईल-टीव्हीचा अतिवापर टाळा

Advertisement

आज जागतिक दृष्टीदिन. दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी हा दिन साजरा करण्यात येतो. मुलांच्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, हे सांगताना बाळांनो, आपल्या डोळ्यांवर प्रेम करा हे आजच्या दृष्टीदान दिनाचे घोषवाक्य आहे. साडेचारशे मिलियन मुलांना डोळ्यांचा काही ना काही त्रास आहे. त्यावर उपाययोजना अत्यंत गरजेची आहे. पण उपचार परवडत नाहीत म्हणून आधी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या महामारीमुळे आपल्याला घरी बसावे लागले आणि मोबाईल व टीव्हीचा वापर अतिरिक्त प्रमाणात वाढला.

Advertisement

अभ्याससुद्धा ऑनलाईन असल्याने पर्यायही नव्हता. मोबाईल व टीव्ही यांच्या पडद्याचा डोळ्यांवर अत्यंत वाईटदृष्ट्या परिणाम होतो. कारण हा पडदा कोणत्याही प्रकारचा असला तरी काही प्रमाणात प्रकाश बाहेर टाकतो आणि त्यामुळे पडद्यावरचे काहीही पाहताना तेही सतत पाहताना डोळ्यांच्या पांढऱ्या आणि काळ्या दोन्ही भागांना कोरडे पडण्याची शक्यता वाढते. पडद्यावरचे एक पान वाचणे म्हणजे पुस्तकाची पंधरा पाने वाचण्यासारखे आहे. मग कल्पना करा, पडद्यावरचे वाचल्याने आपल्या डोळ्यांवर किती ताण पडत असेल.

आपले डोळे सदैव ओलसर असतात. कारण अश्रू डोळ्यात नेहमीच असतात. पापणी हलली की अश्ा़dरू डोळाभर पसरले जातात. साधारणपणे मिनिटाला 12 ते 15 वेळा आपली डोळ्याची पापणी उघडझाप करत असते. जेव्हा आपण एकाग्रतेने काही वाचतो, त्यावेळी पापण्यांची उघडझाप मिनिटाला पाचपर्यंत कमी होते. त्यामुळे डोळ्यात अश्रू नीट पसरले जात नाहीत व कोरडेपणा उद्भवतो. आपले डोळे कोरडे झाले किंवा डोळ्यांवर ताण पडतो, हे ओळखता येते. जेव्हा आपले डोळे लालसर होतात, खाजू लागतात, डोके दुखते व पापण्यांना फोड येतात. याचसाठी पालकांनी व मोठ्या माणसांनी मुलांसमोर खेळण्याबद्दल बोलणे आवश्यक आहे.

सतत हातात मोबाईल व समोर टीव्ही चालू ठेवल्याने मुले मोठ्यांचे अनुकरण करतात. म्हणून पालकांनी व मोठ्यांनीच प्रथम या गॅझेट्सपासून दूर रहावे किंवा त्यांचा वापर मर्यादित करायला हवा. मोबाईल किंवा पडदा पाहताना मुलांची बैठक योग्य असायला हवी. अन्यथा डोकेदुखी व पाठदुखी उद्भवू शकते. मुलांना पलंगावर झोपून मोबाईल बघणे आवडते. पण तसे कधीही करू देऊ नये. टेबलासमोर बसून खुर्चीवर योग्य पद्धतीने बसावे व पुरेशा प्रकाशामध्ये वाचायला हवे. आपल्या डोळ्यापेक्षा पंधरा अंश खालच्या बाजूला पडदा असला पाहिजे. मुले पुढे वाकून पडदा बघण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांची मान दुखते. म्हणूनच मुलांनी सरळ बसले पाहिजे.

बसल्यावर मुलांचे पाय हवेत तरंगू नयेत. ते जमिनीला टेकायला हवेत. पाठ ताठ हवी. नेहमीचा प्रकाश हानिकारक नसतो. पण मोबाईल व टीव्हीच्या पडद्यावर वेगवेगळ्या रंगाचा प्रकाश बाहेर येतो, त्याचा परिणाम डोळ्यावर होतो. सतत टीव्हीसमोर काम करणाऱ्यांना रेटिनाचा त्रास होऊ शकतो. गडद पार्श्वभूमीवर पांढऱ्या रंगातील अक्षरांमुळे डोळ्यांना आराम मिळतो, असे म्हटले जाते. पण हे खरे नाही. पांढऱ्या पार्श्वभूमीवरील गडद अक्षरे डोळ्यांना सुखावते. त्यामुळे गडदपणा कमी करणे हा योग्य उपाय आहे.

मुलांना चष्मा लागल्यावर नेत्रतज्ञ बाहेरच्या हवेत खेळण्याचा सल्ला देतात. टीव्ही, कॉम्प्युटर, मोबाईलपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. जेणेकरून डोळ्यांचा त्रास कमी होतो. एकाग्रता वाढते व स्थूलत्वाचा धोका टळतो. मुख्य म्हणजे झोपेच्या तक्रारी कमी होतात. आपली मुले ही उद्याचे सुजान नागरिक आहेत. यासाठी आपण काळजी घ्यायला हवी. मोबाईल किंवा पडद्यावर वाचन करण्यापेक्षा पुस्तक वाचायला हवे, खेळायला हवे आणि पडद्याचा वापर कमी करायला हवा. या तीन सूत्रींचे पालन केल्याने आपले डोळ्यांचे स्वास्थ्य टिकून राहते.

डोळ्यांच्या काळजीसाठी 20 मिनिटे हा नियम पाळा

डोळ्यावर ताण आल्याची लक्षणे

-डॉ. शिल्पा कोडकिणी,डॉ. कोडकिणी आय सेंटर,अयोध्यानगर-बेळगाव

(शब्दांकन- आशा रतनजी)

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article