महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

माझ्या परिवाराला सांभाळून घ्या! काँग्रेस नेत्या सोनिया गांधींचे रायबरेलीच्या लोकांना भावुक पत्र

07:00 AM Feb 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

:  मतदारसंघ सोडण्यासंबंधी मांडली भूमिका

Advertisement

वृत्तसंस्था /रायबरेली

Advertisement

उत्तरप्रदेशमधील रायबरेलीच्या खासदार  आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी स्वत:च्या मतदारसंघातील लोकांना उद्देशून भावनिक पत्र लिहिले आहे. सोनिया गांधी यांनी बुधवारी जयपूर येथे पोहोचून राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अशा स्थितीत आगामी लोकसभा निवडणुकीत त्या रायबरेली येथून काँग्रेसच्या उमेदवार नसतील हे स्पष्ट झाले आहे.  2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यानच सोनिया गांधी यांनी पुढील निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा केली होती. पुढील काळात सोनिया गांधी या राज्यसभेत दिसून येणार आहेत. रायबरेलीच्या लोकांना सोनिया गांधी यांनी परिवाराला सांभाळून घेण्याचे भावुक आवाहन केले आहे.

मी आज जी काही आहे, ती रायबरेलीच्या जनतेमुळे. मतदारसंघातील लोक आमच्या परिवाराची काळजी घेतील असा मला विश्वास आहे. रायबरेलीशी माझे जवळचे नाते राहिले आहे. माझ्या परिवाराचे दृढ नाते राहिले आहे. आरोग्याच्या कारणांमुळे मी लोकसभा निवडणूक लढविणार नाही. दिल्लीत माझा परिवार अपूर्ण असतो, रायबरेलीत आल्यावर आणि येथील लोकांना भेटल्यावर माझा परिवार पूर्ण होतो असे त्यांनी स्वत:च्या पत्रात नमूद केले आहे.

रायबरेलीशी आमच्या परिवाराचे जवळचे नाते आहे. सासरकडून हे नाते भाग्याप्रमाणे प्राप्त झाले आहे. रायबरेलीसोबत आमच्या परिवाराच्या नात्यांची मूळं अत्यंत खोल रुजलेली आहेत. स्वातंत्र्यानंतर झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत माझे सासरे फिरोज गांधी यांनी रायबरेली येथून विजय मिळवत संसदेत प्रवेश केला होता. त्यानंतर माझ्या सासू इंदिरा गांधी यांना रायबरेलीच्या जनतेने आपलं मानलं. तेव्हापासून आतापर्यंत हे सत्र जीवनाच्या उतार-चढाव आणि खडतर मार्गावर प्रेम आणि उत्साहासोबत पुढे जात राहिले आहे. रायबरेलीवरील आमची श्रद्धा मजबूत होत गेली आहे. या प्रकाशमान मार्गावर येथील जनतेने मलाही वाटचाल करण्याची संधी दिल्याचे सोनिया गांधी यांनी पत्रात म्हटले आहे.

इंदिरा, राजीव गांधी यांच्या हत्येचा उल्लेख

रायबरेलीच्या लोकांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात सोनिया गांधी यांनी इंदिरा गांधी आणि पती राजीव गांधी यांच्या हत्येचाही उल्लेख केला आहे. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांना कायमस्वरुपी गमावल्यावर मी रायबरेलीच्या लोकांसमोर आले. येथील लोकांनी मला नेहमीच साथ दिली. मागील दोन निवडणुकांमध्ये खडतर परिस्थिती असूनही येथील लोक माझ्यामागे ठामपणे उभे राहिले, हे मी कधीच विसरू शकत नाही. याचमुळे मी आज जी काही आहे ती रायबरेलीच्या लोकांमुळे हे गर्वाने म्हणू शकते. येथील लोकांचा विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रयत्न मी नेहमीच केला असल्याचे काँग्रेस नेत्या सोनिया यांनी पत्राद्वारे म्हटले आहे.

आरोग्य, वयाचा दाखला

सोनियांनी रायबरेलीच्या जनतेला लिहिलेल्या पत्रात स्वत:चे वय आणि आरोग्याचा दाखला दिला आहे. लोकसभा निवडणूक न लढविण्यासाठी त्यांनी हे कारण दिले आहे. या निर्णयामुळे मला थेट रायबरेलीच्या लोकांची सेवा करण्याची संधी मिळणार नाही. परंतु माझे मन नेहमीच रायबरेलीत गुंतलेले असणार आहे. रायबरेलीचे लोक मला आणि माझ्या परिवाराची काळजी घेतील हे ठाऊक असल्याचे पत्रात त्यांनी नमूद केले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article