महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अत्याधुनिक वाचनालयांचा लाभ घ्या

10:39 AM Feb 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सीईओ राहुल शिंदे यांचे बेळवडी गावच्या भेटीप्रसंगी आवाहन

Advertisement

बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील बेळवडी ग्राम पंचायत आणि डिजिटल वाचनालयाला जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. ग्रंथालय हे गावातील ज्ञानाचे भांडार आहे. या वाचनालयाचा सर्व ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. वाचनालयांमध्ये इयत्ता 8 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना मोबाईल अॅपद्वारे अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जात आहे. त्यामुळे वाचनालयात विद्यार्थ्यांची संख्याही वाढू लागली आहे. यावेळी सीईओ राहुल शिंदे यांनी वाचनालयात आलेल्या ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिवाय गावातील समस्या तातडीने मार्गी लावाव्यात, अशा सूचनाही पीडीओ आणि कर्मचाऱ्यांना केल्या. गावातील अर्धवट कामे त्वरित पूर्ण करावी. नरेगा योजनेंतर्गत विविध विकास कामांना चालना देण्यात यावी, विविध प्रलंबित कामे निकालात काढावीत. नरेंगा योजनेंतर्गत मजुरांना काम द्यावे अशा सूचनाही ग्राम पंचायत पीडीओंना दिल्या. याप्रसंगी पीडीओ अविनाश अंगरगट्टी यांच्यासह ग्राम पंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article