For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वकील भवनासाठी भूखंड उपलब्ध करून कार्यवाही करा

05:48 PM Apr 17, 2025 IST | अनुजा कुडतरकर
वकील भवनासाठी भूखंड उपलब्ध करून कार्यवाही करा
Advertisement

पालकमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना ; मुंबईत जिल्हा बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक

Advertisement

सिंधुदुर्गनगरी येथे जिल्ह्यातील वकिलांचे वकील भवन उभारण्या संदर्भात भूखंड तात्काळ उपलब्ध करून कार्यवाही हाती घ्या अशा सूचना पालकमंत्री तथा मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. सावंतवाडी व मालवण न्यायालयीन इमारतीचा प्रश्न लवकरच सोडवला जाईल असे आश्वासनही त्यांनी शिष्टमंडळाला दिले. पालकमंत्री नितेश राणे यांची मुंबई येथे सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वकील संघटनेच्या अडचणी सोडवण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्र - गोवा बार कौन्सिलचे अध्यक्षअँड. संग्राम देसाई , सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. परिमल नाईक. यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती . यावेळी अँड. संदीप निंबाळकर,अँड, शामराव सावंत,अँड.गोविंद बांदेकर, अँड. स्वरूप पई, अँड. गोवेकर, अँड. पाटकर उपस्थित होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी व मालवण या दोन तालुक्यात.नवीन न्यायालयाची इमारत उभी राहणे आवश्यक असल्याचे महाराष्ट्र बार असोसिएशनचे अध्यक्ष.अँड. संग्राम देसाई व जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड.परिमल नाईक यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे स्पष्ट केले. यावेळी या दोन्ही तालुक्यात ही न्यायालयीन इमारत होण्यासाठी कोणत्या अडचणी येत आहेत याचेही विवेचन केले. यावेळी मालवण तालुक्यातील न्यायालय इमारतीचा प्रश्न सीआरझेड भूखंडच्या जागेत येत आहे त्यामुळे या जागेच्या संदर्भात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या कानी ही बाब घालून हा प्रश्न निश्चितपणे सोडवला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. तर सावंतवाडी तालुक्यातील न्यायालयीन इमारत जागा निश्चित झाली आहे. सावंतवाडी येथे नवीन न्यायालयाची इमारत उभारण्यासाठी जुन्या आयटीआय कार्यालयची जागा उपलब्ध होणे आवश्यक आहे या संदर्भात आयटीआय विभाग व महसूल विभाग यांच्या खात्याकडे आपण पाठपुरावा करून ही जागा मिळवण्याच्या दृष्टीने आपण निश्चित कार्यवाही करू असे श्री राणे यांनी सुचित केले. दोन्ही तालुक्यातील नवीन न्यायालयात इमारत उभारण्यासंदर्भात लवकरात लवकर प्रक्रिया हाती घेतली जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले .

Advertisement
Advertisement
Tags :

.