For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पालकमंत्र्यांविरोधात खोटी बातमी प्रसिद्ध करणाऱ्यांवर कारवाई करा

12:22 PM Jun 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
पालकमंत्र्यांविरोधात खोटी बातमी प्रसिद्ध करणाऱ्यांवर कारवाई करा
Advertisement

बेळगाव : पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याविरुद्ध बनावट फेसबुक पेजवर आक्षेपार्ह व अवमानकारी पोस्ट टाकणाऱ्याविरुद्ध सायबर क्राईमद्वारे चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन मंगळवारी सफाई कामगार हितरक्षण समितीच्यावतीने प्रादेशिक आयुक्तांना देण्यात आले. करुणानाड कुरुबगौडरू व बंडायध्वनी या फेसबुक पेजवर पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याविरुद्ध अवमानकारक पोस्ट टाकण्यात आली असून सदर फेसबुक पेज बनावट आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्याविरुद्ध सतीश जारकीहोळी यांनी 37 आमदारांच्या सह्यांची मोहीम राबविली आहे, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. स्वत: मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सदर आरोप फेटाळले आहेत. तरीही त्यांची बदनामी करण्यासाठी हे कृत्य करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सायबर क्राईमद्वारे चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी विजय निरगट्टी, मुनीस्वामी भंडारी, दीपक वाघेला व इतर उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.