For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Pandharpur News | विठ्ठलाचे दर्शन घेऊन जा अयोध्या, वाराणसी, प्रयागराज

11:57 AM Jun 03, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
pandharpur news   विठ्ठलाचे दर्शन घेऊन जा अयोध्या  वाराणसी  प्रयागराज
Advertisement
भाविकांना आता पंढरपूरहून अयोध्या, वाराणसी आणि प्रयागराजलाही जाता येईल
पंढरपूर : भारताची दक्षिण काशी पंढरपूर येथून आता तिरुपती बालाजी प्रमाणेच रामनगरी अयोध्या, वाराणसी, प्रयागराज (अलाहाबाद) येथे जाण्याची संधी मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील भाविकांनी याचा लाभ मिळविण्यासाठी सुवर्णसंधी रेल्वे विभागाने दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील तसेच पंढरपूर आणि परिसरातील भाविकांसाठी आयआरसीटीसी आणि मध्य रेल्वेच्यावतीने पंढरपूरहून उत्तर भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांसाठी एक विशेष पर्यटन ट्रेन सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ही विशेष ट्रेन शुक्रवार, दि. १२ जून रोजी पंढरपूर स्थानकावरून सुटणार आहे. २१ जून रोजी परत पंढरपूरला येणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
ही विशेष ट्रेन अयोध्या, प्रयागराज आणि वाराणसी या धार्मिक स्थळांना भेट देऊन पुन्हा पंढरपूरला परतणार आहे. २४ डब्यांची ही ट्रेन असणार असून यामध्ये २० स्लीपर क्लास, २ एसी थ्री टियर आणि दोन एसएलआर डब्यांचा समावेश असेल. या विशेष ट्रेनला संपूर्ण प्रवासात एसी लोकोमोटिव्ह इंजिन जोडण्यात येणार आहे.
 
गाडीच्या अंतिम मंजुरीसाठी रेल्वेच्या विविध विभागांकडून पुढील प्रमाणे वेळापत्रकाचे नियोजन केले आहे. १२ जून रोजी पंढरपूरवरून रात्री ७ वाजून २० मिनिटांनी ट्रेन सुटेल., १४ जून रोजी सकाळी १० वाजता ही ट्रेन अयोध्या येथे पोहोचेल., १८ जून रोजी अयोध्येहून रात्री साडे बारा वाजता निघून सकाळी ५.३० वाजता प्रयागराज येथे पोहोचेल.
त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजता प्रयागराजहून निघून रात्री ९ वाजता वाराणसी येथे पोहोचेल., १९ जून रोजी वाराणसी येथे पर्यटकांसाठी थांबा असेल आणि रात्री ११.३० वाजता ही ट्रेन परतीच्या प्रवासाला निघेल., २१ जून रोजी सकाळी १० वाजता ही विशेष ट्रेन पुन्हा पंढरपूर स्थानकावर परत येईल.
Advertisement

उत्तर तांत्रिक पडताळणी आणि मार्गाची उपलब्धता तपासण्याचे काम शुरू आहे. पंढरपूर आणि सोलापूर जिल्ह्यातील भाविकांना थेट पंढरपूरमधूनच भारतातील या पवित्र तीर्थक्षेत्रांची यात्रा करण्याची सुवर्णसंधी या निमित्ताने मिळणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
Advertisement
Tags :

.

© Copyright, All Rights Reserved.