होंडा कार्स इंडिया अध्यक्षपदी ताकाशी नाकाजिमा
ताकुया त्सुमुरा यांची जागा घेणार : 1 एप्रिलपासून घेणार जबाबदारी
वृत्तसंस्था/ नोएडा
जपानमधील ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी होंडा मोटर कंपनी यांनी ताकाशी नाकाजिमा यांची हेंडा कार्स इंडियाच्या नव्या अध्यक्षपदी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदी नियुक्तीची घोषणा केली आहे. नवे अध्यक्ष आपला कार्यभार 1 एप्रिलपासून सांभाळणार आहेत.
वार्षिक व्यवस्थापन बदलाच्या भूमिकेतून होंडा मोटर कंपनीने अध्यक्ष बदलाचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. नाकाजिमा हे प्रदीर्घ काळापासून कंपनीत आपले बहुमुल्य योगदान देत आहेत. नाकाजिमा हे 1994 मध्ये होंडा कंपनीत सुरु झाले असून याआधी या पदावर ताकुया त्सुमुरा हे होते. त्सुमुरा हे जपानमध्ये माघारी परतणार असून तेथे मुख्यालयात तीन वर्षाच्या भारतातील सेवेनंतर कामावर रुजू होणार आहेत.
नाकाजिमांचा परिचय
नव्याने रुजू होणारे नाकाजिमा हे 2021 पासून होंडा मोटर रशियाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी इतर आंतरराष्ट्रीय जपान, चीन, स्पेन, झेक प्रजासत्ताक सारख्या देशातही कंपनीसाठी सेवा केली आहे. व्यवसाय योजना, उत्पादन योजना, विपणन व विक्री वाढीसाठी योगदान अशा विविध विभागांकरीता त्यांनी सेवा प्रदान केली आहे.
ताकुयांची कामगिरी
याचदरम्यान त्सुमुरा यांनी आपल्या भारतातील 3 वर्षाच्या कारकिर्दीत कंपनीची लोकप्रियता वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. ग्राहक संपर्क वाढवण्यासोबतच कंपनीला नफ्यात आणलं आहे.