‘भोला’च्या सेटवर तब्बू जखमी
ऍक्शनदृश्ये करताना झाली दुर्घटना
अभिनेत्री तब्बू स्वतःचा आगामी चित्रपट ‘भोला’च्या सेटवर जखमी झाली आहे. तब्बू या चित्रपटात एक निर्भय पोलीस अधिकाऱयाची भूमिका साकारत आहे. चित्रिकरणावेळी ऍक्शनदृश्य साकारताना तिला मोठी दुखापत झाली आहे.
हैदराबादमध्ये ‘भोला’ चित्रपटातील एका दृश्यासाठी तब्बू घनदाट जंगलात ट्रक चालवत होती. तसेच काही गुंड बाइकने तिचा पाठलाग करत असल्याचे दर्शविण्यात येत होते. परंतु एका बाइक ट्रकला धडकल्याने काचेचा एक तुकडा तब्बूच्या डोळय़ाच्या वरील भागात घुसला. सेटवर असलेल्या मेडिकल स्टाफने तब्बूवर प्रथमोपचार करत जखम अधिक गंभीर नसल्याचे सांगितले आहे.
सेटवर तब्बू जखमी झाल्यावर चित्रपटाचे दिग्दर्शक अजय देवगणने तिला काही दिवस विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. अजय देवगणच्या चित्रपटात तब्बू पोलीस अधिकाऱयाच्या भूमिकेत दिसण्याची ही पहिलीच वेळ नसेल. यापूर्वी ती दृश्यम चित्रपटात पोलीस अधिकाऱयाच्या भूमिकेत झळकली आहे. भोला हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपट कॅथीचा हिंदी रिमेक आहे.
अलिकडेच शिल्पा शेट्टी देखील स्वतःची आगामी वेबसीरिज इंडियन पोलीस फोर्सच्या चित्रिकरणावेळी जखमी झाली आहे. ऍक्शनदृश्य साकारताना तिच्या पायाला प्रॅक्चर झाले आहे. यामुळे तिला 6 आठवडय़ांसाठी चित्रिकरणाला मुकावे लागणार आहे.