विजय सेतुपतिच्या चित्रपटात तब्बू
दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार
दक्षिणेचा सुपरस्टार विजय सेतुपतिच्या अभिनयाचे कौतुक केले जात असते. त्याच्या चित्रपटांची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करतात. अलिकडेच विजयच्या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. आता त्याच्या या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्रीची एंट्री झाली आहे.
विजयच्या या पॅन इंडिया चित्रपटात तब्बू महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. तब्बूच्या एंट्रीची माहिती निर्मात्यांकडुन देण्यात आली आहे. निर्मात्यांनी एक छायाचित्र शेअर केले असून यात तब्बू दिसून येत आहे. विजय सेतुपतिच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ करणार आहे. तर चित्रपटाची निर्मिती देखील पुरी कनेक्ट्स अंतर्गत केली जाणार आहे. या चित्रपटात विजय हा अत्यंत वेगळ्या प्रकारच्या शैलीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण जून महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. हा एक पॅन इंडिया चित्रपट असेल, जो हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळी भाषेतही प्रदर्शित केला जाणार आहे.